Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! आणखी १७५०० महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून १७५०० महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अहिल्यानगरमधील महिलांची पडताळणी करण्यात आली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या पडताळणी सुरु

अहिल्यानगरमधील १७५०० महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजनेत केवायसी न केल्यास मिळणार नाही पैसे

विधानसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना केवायसीदेखील करणे अनिवार्य केले आहे.दरम्यान, आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. या योजनेतून आता अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.

१७५०० महिलांचे अर्ज बाद (Ladki Bahin Yojana 17500 Women Declared Ineligible)

अहिल्यानगर जिल्ह्यात मागील महिन्याभरात १७५०० महिलांचे अर्जा बाद करण्यात आले आहेत. अहिल्यानगरमध्ये एकूण ११ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता यातील काही महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांद्वारे पडताळणी केली जात आहे. त्यातून महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातून साडेसतरा हजार महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. यामधील काही महिला वयोमर्यादेत बसत नाहीयेत तर काही महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच अनेक कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद केले आहेत. याचसोबत ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचे अर्ज बाद केले आहेत.

केवायसी गरजेचे

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्याच कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही केवायसी करु शकतात. केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं 'असे' संकेत, जाणून घ्या कोणती आहेत ती लक्षणं...

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून निषेध

Online Scam: तुमच्या बँक बॅलन्सवर हॅकर्सची नजर; 'या' ट्रिक्सनं सुरक्षित ठेवा पैसा

तुम्ही 10 कोटींचा कुत्रा पाहिलाय का? व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल|VIDEO

मध्यरात्री ठो-ठो, गोळीबाराचा आवाज ऐकून नागरीक घाबरले, बिल्डरच्या ऑफिसवर ३० गोळ्या झाडल्या अन्...

SCROLL FOR NEXT