Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींपुढे पुन्हा संकट? बोगस लाडक्या बहिणींना दणका

Ladki Bahin Scheme Under Scanner: लाडकीची डोकेदुखी आता आणखी वाढणार आहे.. बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.. त्यामुळे आता राज्य सरकारच्या नियमाचं पालन न केल्यास लाडकीचा लाभ बंद होऊ शकतो..
Beneficiaries of the Ladki Bahin scheme in Maharashtra must complete e-KYC within two months or risk losing their ₹1500 monthly financial aid.
Beneficiaries of the Ladki Bahin scheme in Maharashtra must complete e-KYC within two months or risk losing their ₹1500 monthly financial aid.Saam Tv
Published On

लाडक्या बहिणींपुढे पुन्हा एकदा नवं संकट उभं राहिलयं... राज्यात 26 लाख बोगस लाडक्या बहिणींनी योजनेचा बेकायदेशीररित्या लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि लाडकीचा तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी सरकारनं सर्वेक्षणाला आणि अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यातचं आता लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं लाडकीच्या ई-केवायसीचा निर्णय घेतलाय..आदिती तटकरेंनी समाजमाध्यमावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिलीय. मात्र लाडक्या बहिणी ई-केवायसी कशी करू शकतात.

लाभार्थी लाडकींना आता e-KYC करणं बंधनकारक असणार आहे. ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. पुढच्या 2 महिन्याच्या आत e-KYC प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. तर e-KYC न केल्यास लाडकींचा लाभ बंद होणार आहे. तसचं सरकारकडून पात्र महिलांना तातडीने ईकेवायसी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलयं.

मुळात निवडणूक काळात घोषणा केलेल्या लाडकी बहिण योजनेची पूर्ततेमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यातच ई- केवायसी करून लाडक्या बहिणींना लाभ देण्याचा निर्णय पारदर्शकेसाठी महत्त्वाचा आहे. मात्र ई-केवायसीतून बोगस लाभार्थ्यांवर आळा घातला येईल का? बोगस लाडक्यांचा लाभ रोखून राज्याच्या तिजोरीवरील भार कमी होईल का? हाच मोठा प्रश्न आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com