बिझनेस

Jio Diwali Offer: आली दिवाळी...जिओकडून २% मोफत सोने आणि १० लाखांचे बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी

Jio Festive Offer: जिओ गोल्ड ऑफर अंतर्गत, २००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २% अतिरिक्त मोफत सोने दिले जाणार असून, ते ७२ तासांत वॉलेटमध्ये जमा होईल.

Dhanshri Shintre

आजपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. या शुभ प्रसंगी सोने खरेदी करण्याची परंपरा भारतीय घराघरांतून साजरी केली जाते. या पारंपरिक खरेदीला अधिक आकर्षक बनवण्यासाठी जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, १८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत ग्राहकांना सोने खरेदीवर २% मोफत सोने देण्यात येणार आहे. तसेच १० लाख रुपयांच्या आकर्षक बक्षिसांची संधीही दिली जाणार आहे.

ही ऑफर फक्त जिओ फायनान्स आणि मायजिओ अॅपद्वारे उपलब्ध आहे. ग्राहक जर ₹२,००० किंवा त्याहून अधिक किमतीचे सोने खरेदी करतील, तर त्यांना २% अतिरिक्त सोने मोफत मिळेल. हे मोफत सोने व्यवहार पूर्ण झाल्यानंतर केवळ ७२ तासांच्या आत त्यांच्या वॉलेटमध्ये जमा केले जाईल. मात्र, जर ग्राहकांनी ₹२०,००० किंवा त्याहून अधिक किमतीचे सोने खरेदी केले, तर त्यांना ‘जिओ गोल्ड मेगा प्राइज ड्रॉ’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

या प्राइज ड्रॉमध्ये एकूण १० लाख रुपयांच्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. ज्यात स्मार्टफोन, टीव्ही, सोन्याची नाणी, मिक्सर ग्राइंडर आणि गिफ्ट व्हाउचर अशी आकर्षक बक्षिसे असतील. भाग्यवान विजेत्यांची निवड लॉटरीद्वारे केली जाईल आणि त्यांना ईमेल व एसएमएसद्वारे सूचित केले जाईल.

जिओने या विशेष ऑफरबरोबरच ग्राहकांना फक्त ₹१० पासून सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देखील दिली आहे. ज्यामुळे सर्वसामान्य लोकांनाही सोन्याच्या गुंतवणुकीत सहभागी होता येईल. या वर्षी सोन्याच्या किमती सतत वाढत्या मार्गावर आहेत. लग्नसराईचा हंगाम आणि दिवाळीच्या खरेदीचा उत्साह पाहता लवकरात लवकर किमती कमी होण्याची शक्यता कमी दिसते. त्यामुळे ही जिओची ऑफर या सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक सोन्याची संधी ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Missing Link: प्रवासाचा वेळ कमी होणार; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकची काय आहेत वैशिष्ट्ये?

रील की जीवाशी खेळ? वाढदिवसाला पेट्रोल ओतून रस्त्यावर लावली आग

Virar Tourism : मुंबईकरांनो 'विरार'मध्ये लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा, वीकेंडला घ्या घोडेस्वारीचा आनंद

Banana Bread Recipe: टी-टाइम स्नॅकसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि स्वादिष्ट मऊ बनाना ब्रेड, वाचा रेसिपी

Maharashtra heatwave : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा तडाखा; ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू, VIDEO

SCROLL FOR NEXT