रिलायन्स जिओने ६० दिवसांची मोफत जिओहोम ट्रायल सुरू केली आहे.
ग्राहकांना राउटर, एसटीबी आणि इंस्टॉलेशन मोफत मिळेल.
हा प्लॅन इंटरनेट, टीव्ही आणि ओटीटीचा एकत्र अनुभव देतो.
ट्रायल संपल्यानंतर स्वयंचलितपणे ₹५९९ पोस्टपेड प्लॅन लागू होईल.
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. मनोरंजन क्षेत्रात JioHome ब्रँडखाली एक नवे पाऊल टाकले आहे. कंपनीने आपल्या फायबर आणि एअरफायबर ब्रॉडबँड सेवांसाठी तब्बल ६० दिवसांची मोफत ट्रायल ऑफर सुरू केली आहे. या ऑफरचा लाभ नवीन तसेच कोणीही घेऊ शकतो. विशेष म्हणजे, या कालावधीत ग्राहकांना राउटर, सेट-टॉप बॉक्स (एसटीबी) आणि इन्स्टॉलेशनसहित सर्व सुविधा पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या ऑफरचा उद्देश ग्राहकांना कोणत्याही आर्थिक धोकाशिवाय त्यांच्या सेवेची गुणवत्ता स्वतः अनुभवण्याची संधी देणे आहे. सुरुवातीला ही ऑफर फक्त ५० दिवसांसाठी होती. मात्र ग्राहकांच्या प्रतिसादानंतर ती आता ६० दिवसांपर्यंत विस्तारण्यात आली आहे.
जे ग्राहक या ट्रायलसाठी साइन अप करतील. त्यांना चाचणी कालावधीत सर्व उपकरणे व सेवा विनामूल्य मिळतील. ट्रायल पूर्ण झाल्यानंतर, जर यूजर्सनी प्लॅन बदलला नाही, तर त्यांचे कनेक्शन आपोआप ₹५९९ प्रति महिना असलेल्या JioFiber किंवा JioAirFiber पोस्टपेड प्लॅनवर बदलले जाईल. कंपनीने स्पष्ट केले आहे की या ऑफरमध्ये केवळ इंटरनेटच नाही, तर घरगुती मनोरंजनासाठी संपूर्ण सेट-अप समाविष्ट आहे.
जिओच्या वर्धापन दिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या या विशेष ऑफरमुळे यूजर्सना १,००० पेक्षा अधिक डिजिटल टीव्ही चॅनेल, ११ पेक्षा अधिक प्रीमियम ओटीटी अॅप्स आणि अमर्यादित हाय-स्पीड वाय-फायचा मोफत प्रवेश मिळतो. म्हणजेच ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय घरबसल्या टीव्ही, इंटरनेट आणि ओटीटी कंटेंटचा एकत्र अनुभव घेऊ शकतात. हे पॅकेज वैयक्तिक अॅप सबस्क्रिप्शनची आवश्यकता दूर करते, कारण जिओहोमच्या एका बॉक्ससह यूजर्सना टीव्ही, ओटीटी आणि वाय-फायचे(WiFi) संपूर्ण समाधान मिळते.
सेवा मिळवण्यासाठी, ग्राहकांना प्रथम आपल्या पिन कोडच्या आधारे जिओहोम सेवा त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध आहे का हे तपासावे लागेल. यासाठी जिओची अधिकृत वेबसाइट किंवा अॅप वापरून पत्ता किंवा पिन कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. जर सेवा उपलब्ध असेल, तर 'कन्फर्म इंटरेस्ट' या बटणावर क्लिक करून ६० दिवसांच्या मोफत ऑफरचा दावा करता येतो. काही मिनिटांतच ग्राहकांना कोणताही पैसा न देता जिओहोम अॅनिव्हर्सरी ऑफरचा लाभ घेऊन दोन महिन्यांसाठी हाय-स्पीड इंटरनेट, टीव्ही चॅनेल आणि प्रीमियम ओटीटी कंटेंटचा आनंद घेण्याची संधी मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.