JIO GAMING PLANS START AT RS 48 WITH UNLIMITED 5G DATA 
बिझनेस

Jio Recharge Plan: जिओची नवी ऑफर! गेमिंग प्लॅनची सुरुवात फक्त ४८ रुपयांपासून; डेटा, कॉलिंग अन् दमदार ऑफर्स

Jio Gaming Plan: जिओने ग्राहकांसाठी खास गेमिंग प्लॅन उपलब्ध केले आहेत. केवळ ₹४८ पासून सुरू होणाऱ्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोजचा डेटा आणि आकर्षक गेमिंग फायदे मिळतात.

Dhanshri Shintre

  • जिओने ४८ रुपयांपासून सुरू होणारे स्वस्त गेमिंग प्लॅन लाँच केले आहेत.

  • प्रत्येक प्लॅनसोबत जिओगेम्स क्लाउड सबस्क्रिप्शन मोफत मिळते.

  • प्लॅन्समध्ये अमर्यादित डेटा, कॉलिंग आणि प्रीमियम गेम्सचा ऍक्सेसही आहे.

  • गेमर्ससाठी परवडणारे आणि डेटा-रिच पर्याय जिओने उपलब्ध करून दिले आहेत.

जिओने आपल्या टेलिकॉम सेवांच्या सोबत गेमिंग क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. आता कंपनी गेमर्ससाठी खास प्रीपेड गेमिंग प्लॅन्स ऑफर करत आहे. बहुतांश यूजर्सना जिओच्या गेमिंग प्लॅनबद्दल माहिती नसली तरी हे प्लॅन गेमर्ससाठी उपयुक्त आणि किफायतशीर ठरू शकतात. ५जी अमर्यादित डेटा प्लॅन, वार्षिक आणि लोकप्रिय रिचार्ज पॅक्ससोबतच जिओकडे अनेक गेमिंग प्लॅन्स उपलब्ध आहेत.

सर्वात स्वस्त गेमिंग प्लॅन

या प्लॅन्सची खासियत अशी आहे की ते अमर्यादित ५जी डेटासह जिओगेम्स क्लाउडचे सबस्क्रिप्शन देतात. जिओगेम्स क्लाउडमधून ५०० पेक्षा जास्त प्रीमियम गेम्सचा अॅक्सेस मिळतो आणि वापरकर्ते PC, लॅपटॉप किंवा जिओच्या सेट-टॉप बॉक्सवर थेट गेमिंगचा आनंद घेऊ शकतात.

दुसरा प्लॅन १०० रुपयांपेक्षा कमी

या यादीत सर्वात स्वस्त प्लॅन ४८ रुपयांचा आहे. केवळ ४८ रुपयांत ग्राहकांना तीन दिवसांची वैधता मिळते आणि त्यात जिओगेम्स क्लाउड सबस्क्रिप्शनचा लाभ मिळतो. थोडाच अधिक किफायतशीर पर्याय म्हणजे ९८ रुपयांचा पॅक, ज्याची वैधता सात दिवस आहे आणि त्यातही क्लाउड गेमिंगची सुविधा उपलब्ध आहे.

हा प्लॅन दीर्घ वैधतेसह आणि डेटा उपलब्ध

गेमिंगसाठी अधिक दीर्घकालीन प्लॅन हवा असेल तर जिओने २९८ रुपयांचा पॅक उपलब्ध केला आहे. या पॅकमध्ये २८ दिवस जिओगेम्स क्लाउड सबस्क्रिप्शनचा लाभ घेता येतो. याशिवाय, कंपनीकडे ४९५ रुपयांचा आणखी एक प्लॅन आहे जो २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा देतो. या प्लॅनसोबत अतिरिक्त ५ जीबी डेटा, जिओगेम्स क्लाउड, बीजीएमआय, फेस कोड, जिओएआय क्लाउड आणि जिओटीव्हीचा ऍक्सेसही दिला जातो. त्यामुळे हा प्लॅन केवळ डेटा नव्हे तर एंटरटेनमेंट आणि गेमिंगचा संपूर्ण अनुभव देतो.

सर्वात महागडा गेमिंग पॅक ५४५ रुपयांचा आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अतिरिक्त ५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. याशिवाय, जिओगेम्स क्लाउड सबस्क्रिप्शन, प्रीमियम गेमिंग फीचर्स आणि जिओच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर केलेल्या सेलिब्रेशन ऑफरचे फायदेही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत. या सर्व प्लॅन्समधून दिसून येते की जिओने केवळ डेटा आणि कॉलिंग सेवांवर न थांबता गेमिंग क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले आहे. मोबाईल गेमिंगचा वाढता ट्रेंड लक्षात घेता हे प्लॅन्स गेमर्ससाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळच्या पुण्यातील घरावर पोलिसांचा छापा | VIDEO

Maharashtra Live News Update: अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं

'पाकिस्तानने ७ भारतीय लढाऊ विमाने पाडली, त्यांना भंगार..' पंतप्रधानांचा मोठा दावा, ट्रम्पचंही कौतुक

DRDO Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार डीआरडीओमध्ये नोकरी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

SCROLL FOR NEXT