Jio Cheapest Plan  SAAM TV
बिझनेस

Jio Cheapest Plan : Jio चा भन्नाट प्लान; अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा मिळेल फक्त मोजक्या पैशात

Shreya Maskar

अलिकडेच जियोने आपल्या रिचार्जच्या प्लानच्या किंमती वाढवल्या होत्या. म्हणून बरेच यूजर्स जियोवर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. पण आता जियोने एक स्वस्त मस्त रिचार्ज प्लान आणला आहे. आपल्या यूजर्सना आनंदी करण्यासाठी तसेच पुन्हा जियो सोबत कनेक्ट करण्यासाठी हा रिचार्ज प्लान उपलब्ध करण्यात आला आहे. या दमदार रिचार्ज प्लानमुळे अनेक नवीन यूजर्स देखील जियोशी जोडले जातील.

Jio चा 84 दिवसांचा रिचार्ज प्लान

जियोने नुकताच स्वस्त मस्त 3 महिन्याचा रिचार्ज प्लान (Jio Recharge Plan) आणलाय. हा भन्नाट रिचार्ज प्लान तुम्हाला जियो पोर्टल , माय जियो ॲपच्या प्रिपेड प्लानमध्ये मिळेल. जियोच्या या रिचार्जमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली गेली आहे. यासोबतच या रिचार्ज प्लानमध्ये स्थानिक आणि एसटीडी कॉलिंग सेवा देखील मिळणार आहे. हा रिचार्ज प्लान फक्त 479 रुपयांचा आहे. कमी पैशांत तुम्हाला जास्त आनंद घेता येणार आहे. हा रिचार्ज केल्यावर तुम्हाला ३ महिने रिचार्जची काळजी करायला नको. बिनधास्त होऊन तुम्ही कॉल आणि डेटाचा वापर करू शकता.

हा प्लान फक्त पेटीएम आणि फोनपेवर उपलब्ध नाही आहे. त्यामुळे या सुपर सेव्हिंग प्लान विषयी अनेक लोकांना माहित नाही. या 84 दिवसांच्या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना 6 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. तसेच 1000 एसएमएस देखील फ्री मिळतील. तसेच हा प्लान अनेक सुविधांनी युक्त आहे. यात जियो टीव्ही, जियो सिनेमा आणि जियो क्लाउडची सुविधा देखील मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT