एअरटेल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! टेलिकॉम कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स आणत असते. एअरटेल ही देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी मानली जाते. Airtel चे यूजरबेस 38 कोटींहून अधिक आहे. एअरटेलने आपल्या नॉर्थ ईस्ट प्रीपेड वापरकर्त्यांना काही दिवस मोफत कॉलिंग आणि 1.5GB डेटा देण्याची घोषणा केली आहे.
ईशान्येकडील ग्राहकांना दिलासा
गेल्या अनेक दिवसांपासून पावसामुळे मणिपूर, मेघालय आणि मिझोराम यांसारख्या ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. एवढेच नाही तर या आपत्तीत अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे लक्षात घेऊन एअरटेलने आपल्या यूजर्ससाठी खास प्लान आणला आहे.
कंपनीने नॉर्थ ईस्ट युजर्सना दररोज 1.5GB डेटा देण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर यूजर्सना डेटासोबत फ्री कॉलिंगची सुविधाही दिली जाणार आहे. मात्र, कंपनी ही सुविधा 4 दिवसांसाठी देणार आहे. त्याच वेळी, कंपनीने एअरटेलच्या पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी बिल भरण्याची तारीख 30 दिवसांनी वाढवली आहे.
ऑफर काय ?
कंपनीने आपल्या पोस्टपेड ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या वापरकर्त्यांसाठी, कंपनीने बिल भरण्याची तारीख 30 दिवसांनी वाढवली आहे. कंपनीच्या या निर्णयाचा फायदा करोडो पोस्टपेड यूजर्सना होणार आहे.
एअरटेलची नवीन सेवा
एअरटेल कंपनीने नवीन सेवा देखील सुरू केली आहे. कंपनी त्रिपुरामध्ये इंट्रा-सर्कल रोमिंग (ICR) सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत, कंपनी कमकुवत नेटवर्कच्या बाबतीत आपल्या वापरकर्त्यांना इतर नेटवर्कद्वारे कॉल करण्याची सुविधा प्रदान केली आहे. याचा अर्थ कंपनी इतर नेटवर्कच्या वापरकर्त्यांना त्यांचे नेटवर्क वापरण्याची सुविधा देखील देत आहे, जे लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.