Monsoon hits Kerala: मान्सून आला रे! दोन दिवस आधीच केरळात पोहोचला; महाराष्ट्रातल्या एन्ट्रीची तारीख सांगितली!

Monsoon Rain Latest Update: मान्सुनच्या संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवमान खात्याने या संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.
Monsoon hits Kerala: पाऊस आला रे! मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट
Maharashtra Rain Update Monsoon Will Enter On 12 June In MaharashtraSaam Tv

दिल्ली, ता. ३४ मे २०२४

यंदा उन्हाने कहर केला. उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे प्रत्येकजण चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहे. आता या मान्सुनच्या संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवमान खात्याने या संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.

उन्हाळ्याने त्रस्त झालेल्यांसाठी आणि शेतीची मशागत करुन आता वरुणराजाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. आज भारतीय हवामान खात्याने मान्सून संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट दिली असून केरळमध्ये मान्सून धडकल्याची घोषणा केली आहे. १ जूनही मान्सूनच्या आगमनाची तारीख असते, मात्र यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस ५ जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये १० जूनपर्यंत मान्सून बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, वेळेच्या आधीच मान्सूनची एन्ट्री झाल्याने बळीराजासह उकाड्याने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Monsoon hits Kerala: पाऊस आला रे! मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट
Pune Porsche Car Accident: पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईची एन्ट्री? बदललेले रक्ताचे नमुने कोणाचे?

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच बंगालच्या उपसागरात मान्सून मजबुत स्थितीत आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून लवकर बरसेल, असाही अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता कोकणात पाऊस बरसण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Monsoon hits Kerala: पाऊस आला रे! मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट
Jalgaon Crime: दुहेरी हत्याकांडाने भुसावळ शहर हादरलं! माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com