अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे
पुण्यातील ड्रंक आणि ड्राईव्ह प्रकरणात रोज नवीन नवीन माहिती समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी चक्क ससून रुग्णालयात बाहेरील लोकांचा प्रवेश झाल्याची माहिती आता समोर येत आहे. पुणे ब्लड रिपोर्ट प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन तरुणाचे रक्त घेताना रूग्णालयात "त्या" ४ व्यक्ती कोण होत्या? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
ससून रुग्णालयातील नव्हे तर बाहेरच्या लोकांनी आत येऊन अल्पवयीन आरोपीचे (Pune Porsche Car Accident) रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती समोर आली आहे. ससून रूग्णालयामध्ये संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सँपल घेतले होते. मात्र, ऐनवेळी आलेल्या बाहेरच्या इसमांनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास भाग पाडलं असल्याचं समोर येत आहे. कुणाच्या सांगण्यावरून ते रुग्णालयात (Sasoon Hospital) आले होते? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? असे प्रश्न आता निर्माण होत आहे.
बदललेले रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचे होते का? असा सवाल निर्माण होत आहे. डीएनए आणि रक्त नमुना मॅच होण्यासाठी अल्पवयीन तरुणाच्या आईचे रक्त घेतले गेले होते का? अल्पवयीन तरुणाच्या वैद्यकीय चाचणीवेळी त्याची आई ससून रुग्णालयात उपस्थित होती का? ससून रुग्णालयात उपस्थिुत असलेल्या चार बाहेरच्या व्यक्तींपैकी एक अल्पवयीन तरुणाची आई होती का? असे अनेक प्रश्न (Pune News) आता निर्माण होत आहेत.
ससून रुग्णालयाला 'मॅनेज' करण्यासाठी विशाल अगरवालने कोणाला ससून रुग्णालयात पाठविले? त्या व्यक्तीने धाव घेत शिपाई अतुल घटकांबळे याची भेट घेतली. त्याला हे मॅनेज करण्यासाठी येथे कोणाशी बोलावे लागेल, याची माहिती घेतली (Porsche Car Accident Update) आहे. याप्रकरणात डॉ तावरे याचं नाव समोर आलं आहे. अल्पवयीन तरुणाचे रक्त घेताना काही बाहेरील व्यक्ती याठिकाणी उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. यासोबतच विशाल आणि डॉ. तावरे यांचा संपर्क झाल्यानंतर तावरेनेच विशालला रक्त बदललण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.