How to Recharge Yourself : दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी स्वत:ला असे करा रिचार्ज; डोकं आणि मन दोन्ही शांत होईल

Ways To Recharge Yourself : मेडिटेशन केल्याने डोक्यावरील ताण कमी होतो. तसेच आपले आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहते.
Recharge Yourself
How to Recharge YourselfSaam tv
Published On

सध्याच्या जगात अशी एकही व्यक्ती नाही जी प्रचंड तणावात असते. ताण-तणाव आणि स्ट्रेसमुळे अनेकांना विविध आजार जडतात. हे आजार दूर व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं. मात्र हे फक्त स्ट्रेस कमी झाल्यानंतरच शक्य आहे. त्यामुळे आज मेंदूवरील स्ट्रेस कसा कमी करायचा? त्यासाठी काय काय उपाय केले पाहिजेत? यांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Recharge Yourself
All Party Meeting on Maratha Aarakshan: मनोज जरांगे उपोषण मागे घेणार का? सर्वपक्षीय बैठकीत एकमुखानं कोणता ठराव झाला?

मेडिटेशन

दिवसभर आलेला ताण दूर करण्यासाठी मेडीटेशन उत्तम उपाय आहे. यामध्ये तुम्हाला जास्त फिजिकल अॅक्टिवीटी देखील करावी लागत नाही. मेडिटेशन केल्याने डोक्यावरील ताण कमी होतो. तसेच आपले आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहते.

एक्सरसाइज

तुम्हाला तणावातून बाहेर पडण्यासाठी दररोज फक्त ३० मिनिटे तरी एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. मानसिक ताण एक्सरसाइज केल्याने कमी होतो. याने आपल्या संपूर्ण शरीरात योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होतो.

सकाळचे ऊन

कोवळे ऊन आपल्या शरीरावर, मेंदूवर पडणे फार महत्वाचे असते. यामध्ये व्हिटॅमीन डी असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा सकाळी ऊन्हात चालले पाहिजे. त्याने मेंदूवरील ताण कमी होतो. सकाळचे ऊन मिळाल्याने आपल्या शरीरातील व्हिटॅमीन डी ची कमतरता पूर्ण होते.

गाणी ऐका

तुम्ही मेंदूवरील ताण दूर करण्यासाठी गाणी ऐकू शकता. गाणी एकप्रकारची थेरेपी आहे. त्यामुळे आपल्याला अतीशय शांत आणि वाटते. काहीवेळा डोकं जास्तप्रमाणात दुखत असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही गाणी ऐकू शकता. त्याने आपला त्रास कमी होतो.

कुटुंबीय आणि मित्रांसह वेळ घालवा

जेव्हा जेव्हा तुम्हाला तणाव आणि स्ट्रेस जास्त जाणवू लागेल तेव्हा तुम्ही कुटुंबीयांशी बातचीत करत जा. तसेच तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींसह जास्तीत जास्त वेळ घालवत जा. कुटुंबासह वेळ घालवल्याने तसेच मित्रांशी गप्पागोष्टी केल्याने मन हलकं होतं.

Recharge Yourself
All Eyes On Rafah: सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला 'All Eyes On Rafah' नक्की आहे तरी काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com