छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यक्तीचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय. विशेष निरोगी शरीर राहावं यासाठी व्यायाम करत असतानाच मृत्यूने त्याला गाठल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मृत झाला व्यक्ती जीममध्ये व्यायाम करत होता, त्याच्याबरोबर इतर ५ ते ६ जण व्यायाम करत होते. त्यावेळी त्याला ह्रदयविकाराचा झटका आला त्यात त्याचा मृत्यू झाला.
व्यायाम करताना या व्यक्तीला चक्कर येते मग त्यामुळे तो एका खांबचा आधार घेत उभा राहतो, पण अचानक त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. आपला मित्र खाली पडल्याचं कळताच जीममध्ये गोंधळ उडतो. बाकी जण त्याला उचलण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याचा मृत्यू झाला होता. ही संपूर्ण घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान असे व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत, जेव्हा एखाद्या व्यक्तीला नाचताना किंवा चालताना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यात त्या व्यक्तीचा जीव गमवावा लागला.
काही घटनांची उदाहरणे
पालघरमधील एका जीममध्ये अशीच एक घटना घडली होती. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. वसई परिसरात एक व्यक्ती जीममध्ये व्यायाम करत होता. व्यायाम करतानाच तो अचानक पडला त्यात त्याचा मृत्यू झाला. प्रल्हाद निकम असं त्या व्यक्तीचं नाव होतं.
गेल्या महिन्यात ठाण्यात क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूचा मृत्यू झाला होता. एक फलंदाज फलंदाजी करत होता. तर दुसरा फलंदाज नॉन स्ट्राइकला होता. तितक्यात तो उष्णतेमुळे बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले होतं. दोन दिवसांपूर्वी राजस्थानच्या अजमेरमध्ये अशीच एक घटना घडली होती. पिसांगणात भजन गात नाचताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
देवशयनी एकादशीनिमित्त खाकीजी महाराजांच्या मंदिर परिसरात भजन संध्याकाळचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एक व्यक्ती भजनावर नाचत होता. नाचतांच त्याला हर्ट अटॅक आला होता. मृताचा भाऊ बाबू लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.