Janani Suraksha Yojana Google
बिझनेस

Government Scheme: गर्भवती महिला आणि बाळांना मिळणार ६ हजार रुपये; तुम्हाला माहितीये का काय आहे ही योजना?

Janani Suraksha Yojana: भारत सरकार नेहमीच महिलांसाठी नवनवीन योजना राबवत असते. भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभिनयाने जननी सुरक्षा योजना सुरु केली आहे. ही योजना नवीन माता आणि नवजात बालकांसाठी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत सरकार नेहमीच महिलांसाठी नवनवीन योजना राबवत असते. भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभिनयाने जननी सुरक्षा योजना सुरु केली आहे. ही योजना नवीन माता आणि नवजात बालकांसाठी आहे. आई आणि नवजात बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हे या योजनेमागचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत गरीब गर्भवती महिलांना नोंदणीकृत आरोग्य संस्थामध्ये प्रसूतीसाठी जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्या महिलांना प्रसूतीच्या खर्चासाठी पैसे दिले जातात. प्रसूतीच्या दरात वाढ झाल्याने मुलांना आणि आईला योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देषाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने २००५ साली ही योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत गरोदरपणात मुलांची काळजी घेण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या योजनेत गरीब गर्भवती महिलांना ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत देशातील लाखो महिलांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. या योनेत गरोदर महिलांची सरकारी किंवा खासगी रुग्णालयात प्रसुती झाल्यावर पैसे मिळतात. योजनेत गर्भवती महिलांना १,४०० रुपये, शहरी भागात राहणाऱ्या महिलांना १००० रुपये आणि मातृ वंदना योजनेअंतर्गत ५ हजार रुपये मिळतात. जेणेकरुन महिला आणि त्यांच्या बाळांचे पोषण चांगले होईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेचे वय १९ वर्षांपेक्षा जास्त असणे गरजे आहे. देशातील गरीब महिला या योजनेसाठी पात्र असतील. ज्या महिलांची प्रसूती सरकारी रुग्णालयात किंवा घरी होते, त्यांनाच या योजनेचा फायदा होतो. जननी सुरक्षा योजना दोन मुलांपर्यंतच लागू असेल. या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT