Aadhar Card: मृत्यूनंतर तुमच्या आधारकार्डचं काय होणार? जाणून घ्या सविस्तर

Aadhar Card News: भारताचे नागरिक असल्याचे मुख्य ओळखपत्र आधार कार्ड आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड गरजेचे आहे. अगदी रेल्वे तिकीट ते मतदान करण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे.
Aadhar Card News
Aadhar Card NewsSaam Tv
Published On

भारताचे नागरिक असल्याचे मुख्य ओळखपत्र आधार कार्ड आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड गरजेचे आहे. अगदी रेल्वे तिकीट ते मतदान करण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. आधार कार्डशिवाय कोणतीही सरकारी कामे होत नाही. आधार कार्डवर आपली वैयक्तिम माहिती असते. त्यामुळे आधार कार्ड वापरताना विशेष काळजी घ्यावी. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचे काय होते, हे तुम्हाला माहितीये का? याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आधार कार्ड हे UIDAI द्वारे जारी केले जाते. UIDAI च्या नियमांनुसार अल्पवयीन मुले किंवा नवजात बालकांचे आधार कार्ड काढू शकता. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हे आधार कार्ड सरेंडर किंवा बंद करण्याबाबत अद्याप कोणतेही नियम तयार करण्यात आलेले नाही. आधार कार्ड सरेंडर किंवा बंद करु शकत नाही. मात्र, तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आधार लॉक करु शकतात.आधार कार्ड लॉक केल्यानंतर ते कोणालाही वापरता येत नाही. आधार कार्ड लॉक करण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करा.

Aadhar Card News
Gold Silver Rate Fall Today: महाराष्ट्रात सोन्यासह चांदीचे दर गडगडले; मुंबई आणि पुण्यातही स्वस्तात खरेदी करा दागिने

आधार कार्ड या पद्धतीने लॉक करा

  • आधार कार्ड लॉक करण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जाऊन myaadhar या ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर सर्व्हिसवर क्लिक करा आणि लॉक/ अनलॉक बायोमॅट्रिक पर्याय निवडा.

  • यानंतर तुमच्या स्क्रिनवर नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर भरा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.

  • ओटीपी भरल्यानंतर बायोमॅट्रिक डेटाला लॉक अनलॉक करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा.

  • यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होईल. आधार कार्ड लॉक झाल्यावर ते कोणत्याही व्यक्तीला ओपन करता येणार नाही.

Aadhar Card News
Investment Tips: पहिलाच जॉब आहे? मग आर्थिक गुंतवणूकीसाठी हे पर्याय आहेत बेस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com