ITR Refund Saam Tv
बिझनेस

ITR Refund: ITR रिफंड प्रोसेस दिसतंय पण पैसे मिळाले नाही? काय करावे? वाचा सविस्तर

ITR Refund Processed: आयटीआर फाइल करण्याची मुदत संपली आहे. लाखो करदात्यांनी आयटीआर फाइल केले आहे तरीही त्यांना रिफंड मिळाला आहे. ज्या करदात्यांना रिफंड मिळाला नाही त्यांनी काय करावे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

आयटीआर फाइल केला तरी रिफंड मिळाला नाही

रिफंड मिळाला नाही तर काय करावे?

आयटीआर रिफंडचा स्टेट्स कसा चेक करायचा?

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख उलटून २० दिवस झाले आहेत. दरम्यान, आयटीआर फाइल केल्यानंतर अनेकांच्या खात्यात रिफंड जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु अजूनही अनेकांच्या खात्यात रिफंडचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे करदात्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन तुमच्या रिफंडचा स्टेट्‍स चेक करु शकतात.

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर होती. त्यानंतर अनेकांना रिफंड मिळाले आहेत. दरम्यान, रिफंड मिळण्यासाठी साधारणपणे १ महिन्याचा कालावधी लागतो. अनेकांना त्याच दिवशी रिफंड मिळाला आहे. परंतु ज्यांना रिफंड मिळाला नाही असे करदाते टेन्शनमध्ये आहे.

करदाते आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन रिफंडचा स्टेट्‍स चेक करु शकतात. करदात्यांच्या आयटीआर स्टेट्समध्ये “processed” असं दिसतं.तरीही त्यांना रिफंड मिळालेला नाही.

रिफंड चेक करण्यासाठी काय करावे? (How To Check ITR Refund Status)

सर्वात आधी ई फायलिंग पोर्टलवर जावे.

यानंतर रिफंड किंवा डिमांड सेक्शनवर जावे.

यानंतर तुम्हाला रिफंडमध्ये “processed” असं दिसत असेल आणि तरीही रिफंड जमा झाला नसेल तर पुढे प्रोसेस करा.

यानंतर तुम्ही दिलेला बँक अकाउंट आणि IFSC नंबर बरोबर आहे की नाही हे चेक करा.

जर तुम्ही बँक अकाउंटची माहिती चुकीची दिली असेल तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही.

रिफंड येण्यास उशिर झाला तर काय करावे?

काही वेळेला तुमच्या टॅक्स क्रेडिट आणि टीडीएसमध्ये काही चुका आढळून आल्या तर तुम्हाला रिफंड येण्यास उशिर येऊ शकतो. जर तुमच्या बँक अकाउंटची माहिती चुकीची असेल तर तुम्हील ई-फायलिंग हेल्पडेस्कला संपर्क साधून याबाबत माहिती देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शाहरुख खानला मोठा दणका समीर वानखडे यांची याचिका स्वीकारली

गुन्हेगारी स्टाईल रिल्स करणाऱ्यांचा नाशिक पोलिसांनी उतरवला माज|VIDEO

Heart Attack Symptom: हार्ट अटॅकची लक्षणे जावणवतायेत? हा १ पदार्थ चघळा वाचेल तुमचे आयुष्य, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Crime: २ विद्यार्थ्यांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर; आजारी पडल्यानंतर...

Instagram Award Function: इन्स्टाग्राम युजर्सला खुशखबर! टॉप क्रिएटर्सना मिळणार स्पेशल गिफ्ट, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT