Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Income Tax Refund: इन्कम टॅक्स रिफंड येण्यास का होतोय उशीर?; प्राप्तिकर विभागाने स्वतःच सांगितलं कारण

How to Check Income Tax Refund Status: इन्कम टॅक्स रिफंडचे पैसे करदात्यांच्या अकाउंटला जमा होण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे करदात्यांनी सोशल मीडियावर आणि हेल्पलाइन नंबरवर तक्रारी नोंदवल्या आहेत.

Siddhi Hande

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केल्यानंतर अनेक करदात्यांना रिफंड वेळेवर मिळत नाही. रिफंड वेळवर न मिळाल्याने करदात्यांनी तक्रारी केल्या आहेत. करदात्यांनी सोशल मीडियावर आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या हेल्पलाइन क्रमाकांवर फोन करत याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारींवर प्राप्तिकर विभागाने उत्तर दिले आहे. प्राप्तिकर विभागाने म्हटलंय की, करदात्यांना परतावा वेळेव दिला जात आहे. परंतु काही कारणांमुळे हा परतावा वेळेवर मिळत नाही. ते करदाते आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन स्थिती तपासू शकतात. तसेच ते मेलदेखील करु शकतात.

प्राप्तिकर विभाग मोठ्या प्रमाणात आयटीआर कागदपत्रांची पडताळणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न बरोबर फाइल केला आहे की हे आयकर विभाग चेक करत आहे. त्यामुळे रिफंड येण्यास उशीर होत आहे.

इन्कम टॅक्स रिफंड उशीरा मिळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयटीआर फाइल करताना बँक खात्याच्या माहितीत त्रुटी असणे. जर तुमचा परतावा मिळण्यात उशीर होत असेल तर तुम्ही याची तक्रार orm@cpc.incometax.gov.in या ईमेलवर जाऊन करु शकतात. याचसोबत तुम्ही पॅन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर लिहून पाठवावा.

अशा प्रकारे परताव्याची स्थिती चेक करा

तु्म्हाला सर्वप्रथम https://eportal.incometax.gov.in वर जाऊन तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे. यानंतर सर्व्हिस विभागात जा. तिथे जाऊन Know Your Refund Status या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला २०२३-२४ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या परताव्याची स्थिती समजू शकेल. तसेच तुम्ही पोर्टलवरच परताव्यासाठी अर्ज करु शकतात.

इन्कम टॅक्स रिफंड उशीरा येण्याची कारणे

इन्कम टॅक्स रिफंड वेळेवर न येण्याची अनेक कारणे असू शकतात. तुम्ही आयटीआर व्यवस्थित फाइल न केल्यास तुमचा रिफंड येण्यास उशीर होऊ शकतो. तसेच बँक खात्याची चुकीची माहिती, अकाउंट नंबर,आयएफसी कोड चुकीचा असणे या कारणांमुळे रिफंड येण्यास उशीर होतो. तसेच तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसल्यास तुमच्या अकाउंटला रिफंड उशीरा येतो.

तुमचा रिफंड येण्यास उशीर होत असेल तर तुम्ही 18001030025,18004190025,8046122000,8061464700 या नंबरवर सोमवार वे शुक्रवार कालावधीत आठ ते रात्री आठ या कालावधील फोन करुन तक्रार करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT