Income Tax: सावधान! 'इन्कम टॅक्स रिफंड' असा मेसेज फोनवर आला तर होऊ शकता कंगाल, कसं? वाचा सविस्तर

Income Tax Refund Message Scam: सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न फॉर्म जारी केले आहेत. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख सध्या 31 जुलै 2024 आहे. या दरम्यान इन्कम टॅक्स रिफंडच्या नावाखाली फसवणुक होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Cyber Safety Alert
Cyber Safety AlertSaam Tv
Published On

Cyber Safety Alert

सध्या सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. चुकीचे आणि दिशाभूल करणारे संदेश पाठवतात. आपली खासगी माहिती काढून घेतात. मग आपल्या खात्यातून पैसे काढले जातात. सध्या या प्रकारांचं प्रमाण फार वाढतंय. इन्कम टॅक्स रिफंडच्या नावाखाली देखील अशीच लूटमार सुरू आहे. त्यामुळे अशा फसवणुकींना बळी न पडण्याचं आवाहन थेट आता गृह मंत्रालयाकडून केलं जातंय. (Maharashtra News)

तुमच्या फोनवर इन्कम टॅक्स रिफंडच्या (Income Tax Refund) नावाने कोणताही मेसेज आला असेल, तर त्यावर क्लिक करण्यापूर्वी सावध व्हा. या प्रकारच्या संदेशामुळे तुमचं खातं रिकामं होऊ शकते. इन्कम टॅक्स रिफंड करण्याचा दावा करणारे मेसेज हे बनावटही असू शकतात, वापरकर्त्यांना गृह मंत्रालयाने सावधगिरीने कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याचा इशारा (Cyber Safety) दिलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशा प्रकारे होते फसवणूक

सध्या आयकर परताव्याच्या नावाखाली सायबर ठग लोकांना आपला बळी बनवत (Cyber Safety)आहेत. फसवणूक करणारे आयकर विभागाच्या नावाने लोकांना संदेश पाठवतात. त्या संदेशामध्ये त्यांचा इन्कम टॅक्स रिफंड तयार आहे. तो मिळविण्यासाठी त्यांना एका लिंकवर क्लिक करावं लागेल, असं नमूद असतं. जेव्हा लोकं या लिंकवर क्लिक करतात. तेव्हा त्यांना एक फॉर्म भरण्यास सांगितलं जातं.

या (Income Tax Refund) फॉर्ममध्ये, त्यांना बँक खात्याची माहिती आणि इतर वैयक्तिक तपशील विचारले जातात. सर्व तपशील मिळाल्यानंतर फसवणूक करणारे लोकांच्या खात्यातून पैसे काढतात.

Cyber Safety Alert
Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; महिलेची १० लाखात फसवणूक

फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

प्राप्तिकर विभाग कधीही कोणत्याही प्रकारच्या संदेश किंवा ईमेलद्वारे तुमची वैयक्तिक माहिती विचारत नाही. तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील विचारणारा कोणताही संदेश किंवा ईमेल प्राप्त झाल्यास, त्याकडे त्वरित दुर्लक्ष करा. आयकर परताव्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी फक्त आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटलाच (Cyber Safety) भेट द्या.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल

इन्कम टॅक्स रिफंडच्या (Income Tax Refund) नावाने येणाऱ्या कोणत्याही मेसेज किंवा ईमेलवर विश्वास ठेवू नका. तुमच्या बँक खात्याची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा वेबसाइटसोबत शेअर करू नका. तुमचा संगणक किंवा मोबाईल फोन नेहमी अँटीव्हायरसने अपडेट ठेवा. या गोष्टी लक्षात ठेवल्यास आयकर परताव्याच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळता येईल.

Cyber Safety Alert
Cyber Insurance: लाईफ इन्शुरन्स विसरा..'सायबर इन्शुरन्स'च्या युगाला सुरुवात, जाणून घ्या काय आहेत फायदे?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com