ITR Refund Saam Tv
बिझनेस

ITR Refund: आज आयटीआर फाइल करा, उद्या खात्यात पैसे जमा, २४ तासात मिळणार रिफंड

ITR Refund Come In Just 24 Hours: आतापर्यंत अनेकांनी आयटीआर फाइल केला आहे. दरम्यान, आता फक्त २४ तासात तुमच्या खात्यात रिफंडचे पैसे जमा होणार आहेत.

Siddhi Hande

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेकांनी आयटीआर फाइल केला आहे. त्यानंतर अनेक करदात्यांचे रिफंड जमा होण्यास सुरुवातदेखील झाली आहे. आता ITR-2 आणि ITR3 फॉर्मदेखील अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे आता हे फॉर्म भरणारे करदातेही लवकरच आयटीआर फाइल करु शकतात. ज्याप्रकारे आयटीआर फाइल केला जात आहे. त्याच पद्धतीने आयटीआर रिफंडदेखील खात्यात जमा केला जाणार आहे.

रिफंड कुठे जमा होतो?

पगादरावर वर्गापासू ते बिझनेसमॅनपर्यंत सर्वांच्या अकाउंटमध्ये रिफंडचे पैसे जमा केले जातात.याआधी रिफंड येण्यत २० दिवस किंवा १ महिना लागायचा. कधी-कधी तांत्रिक अडचणींमुळे ३-४ महिन्यांनीदेखील रिफंड जमा व्हायचा. दरम्यान आता रिफंड फक्त २४ तासात जमा होणार आहे. जास्तीत जास्त ५ ते १० दिवसांत पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील. जर तुम्ही लवकर आयटीआर फाइल केला तर रिफंडदेखील लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल.

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय?

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख यावर्षी वाढवून देण्यात आली आहे. या वर्षी तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. मुदतीपूर्वी आयटीआर फाइल करा. जर तुम्ही मुदतीनंतर आयटीआर फाइल केला तर तुम्हाला बिलेटेड आयटीआर फाइल करावा लागेल. याचसोबत दंडदेखील भरावा लागेल.

ITR कसा फाइल करावा?

आयटीआर फाइल करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला incometax.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.

जर तुम्ही टॅक्स रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकून लॉग इन करावे लागेल.

यानंतर ई फाइल टॅबमध्ये जाऊन फाइल आयटीआरवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार इंडिविड्युअल, एचयूफ किंवा इतर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानुसार (ITR 1,ITR 2, ITR 3 )फाइल करायचा आहे.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर आयटीआर ई-वेरिफाय करायचे आहे.

यानंतर तुम्हाला लवकरात लवकर रिफंड मिळेल.

कोणते कागदपत्र आवश्यक?

जर तुम्हाला आयटीआर फाइल करायचा असेल तर पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट, फॉर्म 16, डोनेशन रिसिप्ट, स्टॉक ट्रेडिंग स्टेटमेंट, बँक अकाउंट आणि पॅन कार्ड लिंक असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

Liver Infection: लिव्हर इन्फेक्शन झाल्यास शरीरात 'ही' लक्षणे दिसतात, वेळीच घ्या काळजी नाहीतर...

SCROLL FOR NEXT