आयकर विभागाने आयटीआर भरण्यास सुरुवात करण्यास सांगितले आहे. यासाठी आयकर विभागाने सर्व आयटीआर फॉर्म जारी केले आहेत. करदात्यांनी आपल्या उत्पन्नानुसार फॉर्म भरायचे आहेत. याआधी एप्रिल महिन्यातच आयटीआर फॉर्म जारी केले जात होते. दरम्यान, यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. दरम्यान, आयटीआर फाइल करण्यास जास्त घाई करणे आणि जास्त उशीर करणेदेखील योग्य नाही. तुम्हाला योग्य वेळी आयटीआर भरायचा आहे. तसेच आयटीआर भरताना काही तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी सॉफ्टवेअर वैगेरे असणे गरजेचे आहे.
आयटीआर कधी फाइल करावा? (Best time to file ITR)
इन्कम टॅक्स नियमांनुसार, करदात्यांना टीडीएस सर्टिफिकेट, फॉर्म 16, फॉर्म16A तुम्हाला १५ जूनपर्यंत मिळणार आहे. हा फॉर्म तुम्हाला नियोक्त्याकडून दिला जातो. हा फॉर्म आल्यानंतरच तुम्ही आयटीआर फाइल करु शकणार आहात.
याचसोबत जर एखाद्या करदात्याने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीत कोणते उत्पन्न मिळवले असेल ज्यावर टीडीएस लागू आहे तर त्या उत्पन्न देयकाने ई टीडीएस रिटर्न फाइल करावा लागेल. ३१ मेपर्यंत तुम्हाला हा रिटर्न फाइल करायचा आहे. त्यानंतर हा डेटा फॉर्म 26AS मध्ये अपडेट होईल. याच्या आधारे तुम्ही आयटीआर भरु शकणार आहात.
टीडीएस, फॉर्म १६ मिळण्यासाठी वेळ लागतो. जून महिन्यापर्यंत ही सर्व कागदपत्रे मिळतात. जूनच्या आधी सर्व माहिती मिळणे कठीण असते. त्यामुळे या काळात तुम्ही आयटीआर फाइल करु नका. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच इन्कम टॅक्स रिटर्न भरा अन्यथा तुम्हाला अडचणी येतील.
जून महिन्यानंतरच आयटीआर भरा
गेल्या वर्षात आयकर नियमांमध्ये बदल झाले आहे. अनेक वित्तीय संस्थाना आता आर्थिक वर्षात होणाऱ्या व्यव्हारांचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. यालाच स्पेसिफाइल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणतात. हे अहवाल ३१ मेपर्यंत पूर्ण केले जातात. याचसोबत या सर्व गोष्टींची अॅन्युअल इन्कम स्टेटमेंटमध्ये (AIS) माहिती अपडेट करण्याची प्रोसेस जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाते.त्यामुळे त्यानंतर आयटीआर भरावा.
आयटीआर कधी भरावा?
जेव्हा आयटीआर सुरुवातीला पोर्टल ओपन करते तेव्हा त्यात अनेक तांत्रिक त्रुटी असू शकतात. यामध्ये सिस्टीम बिघाड, डेटा याबाबत समस्या असू शकतात. तसेच करदात्यांनी जर १५ जूनपूर्वी आयटीआर फाइल केला तर त्यांच्याकडे 26AS,फॉर्म 16/16A, फॉर्म AIS मधील अपूर्ण माहिती भरती तर अनेक अडचणी येतील. त्यामुळे १५ जूननंतरच सर्व माहिती मिळाल्यावर तुम्ही आयटीआर फाइल करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.