ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! अजूनही फाइल करता येणार आयटीआर; स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Revised or Belated ITR Filling 2025: आयटीआऱ फाइल करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. दरम्यान, तरीही तुम्ही आयटीआर फाइल करु शकतात. तुमच्याकडे बिलेटेड किंवा रिवाइज्ड आयटीआर फाइल करण्याचा पर्याय आहे.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

अजूनही आयटीआर फाइल केला नाही?

करु शकता बिलेटेड किंवा रिवाइज्ड आयटीआर फाइल

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२५ होती. दरम्यान, पहिल्यांदाच आयकर विभागाने आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढवली आहे. दरम्यान, अजूनही जर कोणी आयटीआर केला नसेल तर ते करु शकतात. जर आयटीआर फाइल करताना काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही बदलू शकतात. यासाठी प्रोसेस वाचा.

कोणत्या चुका बदलू शकतात

अनेकदा करदाते आपली वैयक्तिक माहिती चुकीची भरतात. इन्कम सोर्सबाबतही चुकीची माहिती भरतात.काहीजण टॅक्स डिडक्शन क्लेम करणे विसरतात. दरम्यान, अशा चुका झाल्या असतील तर तुम्ही Revised ITR भरुन त्या बदलू शकतात. तुम्ही डिसेंबर २०२५ पर्यंत रिवाइज्ड आयटीआर फाइल करु शकतात.

रिवाइज्ड आयटीआर कसा फाइल करायचा? (How to File Revised ITR)

सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर e-File सेक्शनमध्ये इन्कम टॅक्स रिटर्नवर क्लिक करा.

यानंतर फाइल File Income Tax Return वर क्लिक करा.

यानंतर Revised Return हा ऑप्शन निवडा.

यानंतर तुमची चुकीची माहिती बदलून घ्या. यानंतर आयटीआर एॅक्नोलेजमेंट नंबर टाका.

यानंतर फॉर्म सबमिट करुन वेरिफाय करा.

जर आयटीआर फाइल केला नसेल तर (Belated ITR)

जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नसेल तर बिलेटेड आयटीआर फाइल करु शकतात. यासाठी तुम्हाला फी भरावी लागेल. तुम्हाला दंडदेखील भरावा लागेल. याचसोबत टॅक्सवर दर महिन्याला १ टक्के व्याजदर भरावे लागणार आहे. यामध्ये तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर १००० रुपये शुल्क भरावे लागेल आणि ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ५००० रुपये दंड भरावा लागेल.

बिलेटेड आयटीआर कसा फाइल करायचा?

तुम्ही बिलेटेड आयटीआर फाइल करु शकतात. परंतु तुम्ही टॅक्स रिजीम बदलू शकत नाही. तुम्हाला यात जो टॅक्स रिजीम निवडला आहे त्याचनुसार फॉर्म भरायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT