ITR Filling: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! या वर्षी आयटीआर फाइल केला नाही तर काय होणार? वाचा सविस्तर

ITR Fillig 2025: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ होती. जर तुम्ही यावर्षी आयटीआर फाइल केला नसेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On
Summary

आयटीआर फाइल करण्याची अंतिम तारीख संपली

आयटीआर फाइल न केल्यास काय होणार

बिलेटेड आयटीआरबाबत सविस्तर माहिती

प्रत्येक करदात्याला आयटीआर फाइल करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला अडचणी येतील. यावर्षी आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती. काही टेक्निकल कारणांमुळे आणि आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस उशिरा सुरु झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली होती. ज्या करदात्यांना ऑडिटची गरज नाही, अशा करदात्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२५ बोही.

ITR Filling
ITR Refund: ITR रिफंड प्रोसेस दिसतंय पण पैसे मिळाले नाही? काय करावे? वाचा सविस्तर

दरम्यान, सीडीबीटीने टॅक्स ऑडिट रिपोर्टची तारीख ३० सप्टेंबरवरुन ३१ ऑक्टोबर केली आहे. ज्या करदात्यांना ऑडिट करायचे आहे. ऑडिट रिपोर्टची डेडलाइन वाढवून देण्यात आली आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख तीच आहे. दरम्यान, ज्या करदात्यांनी यावर्षी आयटीआर फाइल केला नाही त्यांचे काय होणार ते जाणून घ्या.

आयटीआर भरला नाही तर काय होणार? (What Happen If You Dont File ITR)

जर तुम्हाला ऑडिट करण्याची गरज नाही तर तुमच्यासाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२५ होती. जर तुम्ही या तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही तर तुम्ही बिलेटेड आयटीआर फाइल करु शकतात. दरम्यान, याासठी तुम्हाला काही दंड आणि व्याज द्यावे लागेल.

जर तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ५००० रुपयांचा दंड भरावा लागेल.

जर तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे तर तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागेल.

याचसोबत तुमचा जो टॅक्स आहे त्यावर तुम्हाला Section 234A अंतर्गत १ टक्के व्याज द्यावे लागते.

ITR Filling
ITR भरण्याची मुदत सरकारने एका दिवसाने वाढवली, पण ३१ डिसेंबरपर्यंतही भरु शकता इनकम टॅक्स रिटर्न्स

बिलेटेड आयटीआर न भरल्यास येणार अडचणी (Belated ITR)

मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नसेल तर त्यांच्यासाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. जर तुम्ही बिलेटेड आयटीआरदेखील भरला नाही तर आयकर विभाग तुमच्या बँक ट्रान्झॅक्शन, TDS, AIS आणि SIS रिपोर्टवर लक्ष ठेवेल.

आयटीआर फाइल न केल्यास होणार कारवाई

जर तुम्ही आयटीआर फाइल केला नाही आणि आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाबाबत माहिती मिळाली तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हा दंड १०० ते ३०० टक्क्यांपर्यंत असू शकतो. तसेच तुमच्यावर कारवाईदेखील होई शकते. यामुळे तुम्हाला बँक लोन, बिझनेस लोन, एज्युकेशन लोन आणि परदेश दौऱ्यासाठी अडचणी येऊ शकतात.

ITR Filling
ITR भरण्याची मुदत सरकारने एका दिवसाने वाढवली, पण ३१ डिसेंबरपर्यंतही भरु शकता इनकम टॅक्स रिटर्न्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com