ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढवणार? ही आहेत ५ महत्त्वाची कारणे

ITR Filling 2025: आयटीआर फाइल करण्यासाठी मुदत वाढवण्याची विनंती करण्यात आली आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटची तारीख यावर्षी वाढवण्यात आली आहे. यात अजून वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

Siddhi Hande

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढवण्यात आली आहे. यावर्षी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. दरम्यान, आता आयटीआर फाइल करण्यासाठी २०-२५ दिवस उरले आहेत. त्यामुळे ज्यांनी आयटीआर भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर भरावेत. दरम्यान, आता टॅक्स भरण्यासाठी डेडलाइन वाढवली जाऊ शकते.

गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि देशातील अनेक कर तज्ज्ञांनी सरकारला याबाबत विनंती केली आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवावी, अशी विनंती केली आहे. कारण त्यांचे म्हणणे आहे की, सध्याच्या परिस्थितीत करदाते आणि चार्टर्ड अकाउंटंट वेळेवर आयटीआर फाइल करु शकणार नाहीत.

मुदत वाढवण्यासाठी विनवणी

जीसीसीआयने सीडीबीटी (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ)ला पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, करदाते आणि व्यावसायिकांना अनेक व्यावहारिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, असं सांगितलं जातं.

१. आयटीआर युटिलिटिज आणि फॉर्म उशिरा जारी होणे

२.सिस्टीममधील काही अडचणी, लॉग इन करण्यास समस्या अशा तांत्रिक अडचणी

३. फॉर्म 26AAS, AIS, TIS अपडेटमध्ये समस्या

४. नवीन आर्थिक फॉर्मॅट लागू होण्यास विलंब

५. ऑगस्ट ते नोव्हेंबरमधील सणांचा परिणाम

GCCI मध्ये नॉन ऑडिटमधील आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मे महिन्यात वाढवली डेडलाइन

या वर्षी पहिल्यांदा आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढवण्यात आली आहे. यामध्ये आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलैवरुन १५ सप्टेंबर करण्यात आली आहे. दरम्यान, CBDT ने सांगितलं की, आयटीआर फॉर्म आणि त्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे आयटीआर फाइल करण्यासाठी कमीत कमी कालावधी लागेल. म्हणूनच डेडलाइन वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : काँग्रेसविरोधात भाजप महिला आघाडीचा कणकवलीत मोर्चा

डोंबिवलीच्या रील स्टारचा आणखी एक कारनामा; 12 वर्षांनंतर उलगडला खून अन् अपहरणाचा प्रकार

Petrol-Diesel Price: टेन्शन वाढलं! कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

बच्चू कडूंच्या हाती 'धनुष्यबाण', कडूंच्या पक्षप्रवेशाचा शिंदेसेनेला फायदा काय?

Aambyachi Kheer Recipe: महाराष्ट्र दिनानिमित्त घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंब्याची खीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT