प्रस्थापित राजकारणाला छेद देत सत्ताधाऱ्यांवर प्रहार करणाऱ्या बच्चू कडूंनी अखेर अपेक्षेप्रमाणे शिंदेसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं...आणि पक्षप्रवेशाला काही तास उलटताच त्यांना शिंदेंनी थेट विधानपरिषदेची उमेदवारी ही दिली.. मात्र ज्या शिवसेनेतून बच्चू कडूंनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली, त्याच भगव्या झेंड्याखाली पुन्हा परतल्यानंतर "राष्ट्रप्रथम, प्रहार आणि शिवसेना" अशी पोस्ट करत... कडूंनी प्रहारच्या विलिनीकरणाचा सस्पेन्स कायम ठेवला... (पोस्ट लावणे वरील VO 2) त्यामुळे बच्चू कडू शिंदेसेनेत तर दाखल झाले. मात्र त्यांच्या प्रहारचं काय? असं विचारताच.... कडू नेमकं काय म्हणाले ऐका...
दरम्यान प्रहारमधून समाजकारण कायम ठेवणार असं सांगणाऱ्या बच्चू कडूंवर विरोधक चांगलेच बरसले... विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपल्यामुळेच कडूंनी हा निर्णय घेतला, असा टोला विरोधकांनी लगावल्यावर मंत्रीपद हवं असतं तर गुवाहाटीला गेलो, असं म्हणत कडूंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय...
दरम्यान बच्चू कडूंच्या पक्षप्रवेशानं शिंदेसेनेला कसा फायदा होणार आहे? बच्चू कडूंच्या रूपाने विदर्भातील एक आक्रमक चेहरा शिंदेसेनेला मिळाला आहे. यामुळे विदर्भ पट्ट्यात शिंदेसेनेला राजकीय पकड मजबूत होण्यास मदत होईल. बच्चू कडूंनी गेल्या 25 वर्षात दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा दिला...त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानं या दोन मोठ्या घटकांचा पाठिंबा थेट शिंदेसेनेला मिळेल... आंदोलनं आणि रस्त्यावरची लढाई यात बच्चू कडूंचा हातखंडा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेसेनेला एक 'फायरब्रँड' नेता मिळालाय.. प्रहार पक्ष स्वतंत्र निवडणुक लढल्यास मतांचे विभाजन होण्याची भीती होती. त्यामुळे आता कडू शिंदेसोबत आल्यानं महायुतीची मते एकत्रित राहतील आणि जागा निवडून येण्याची शक्यता वाढेल....
सध्या प्रहारचे 1 लाख सक्रिय सदस्य आणि 6 लाख दिव्यांग बांधवांचं जाळं अस्तित्वात आहे...
त्यामुळे आमदारकीची ऑफर घेताना प्रहारचं विलिनीकरण न करता कडूंनी घेतलेली सावध भूमिकाही महत्त्वाची आहे... आता प्रहारच्या माध्यमातून समाजकारण आणि शिंदेसेनेतून राजकारण करताना बच्चू कडू शेतकरी आणि दिव्यांगाचं सहकार्य कायम कसं ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.