आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षी आयटीआर फॉर्मदेखील उशिरा आले आहेत. दरम्यान, त्यानंतर आता आयटीआर फाइल करण्याची मुदतवाढदेखील करण्यात आली आहे. तुम्हाला आता १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करता येणार आहे. तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल करावा अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आयटीआर भरण्याची मुदतवाढ ही सर्वांसाठी नाही आहे.
कोणत्या करदात्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची मुदतवाढ केली?
सरकारने अशा करदात्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढली आहे ज्यांच्या त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही. बहुतेक पगारदार वर्ग या श्रेणीत येतो. त्यामुळे या करदात्यांना १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करता येणार आहे.
आयटीआर फाइल करण्याची मुदतवाढ का केली?
सामान्यतः सरकार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आयटीआर फॉर्म जारी करते. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुविधा प्रदान करते जेणेकरुन करदात्यांना आयटीआर वेळेवर फाइल करता येईल. परंतु यावेळी सरकारने सुमारे १ महिना उशिरा आयटीआर फॉर्म जारी केले. या फॉर्ममध्ये काही बदलदेखील करण्यात आले आहेत. त्यामुळेच करदात्यांना हे बदल समजून घेता यावे आणि आयटीआर फाइल करता यावा म्हणून ही मुदत वाढवण्यात आली आहे.
कोणत्या करदात्यांना आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ नाही?
ज्यांच्या खात्यांचे ऑडिट (Audit) करणे गरजेचे आहे. अशा करदात्यांना ऑडिट अहवाल सादर करावा लागतो. त्यांना हे काम लवकरच करावे लागणार आहे.
कर ऑडिट अहवाल तुम्हाला ३० सप्टेंबर २०२५ रोजी सादर करावा लागणार आहे.
ऑडिट केलेल्या खात्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे.
ज्या करदात्यांना ट्रान्सफर किंमत आहे त्यांना ३० नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख आहे.
बिलिटेड रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.