ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: ITR 1 आणि ITR 4 ऑनलाइन फॉर्म भरण्यास सुरुवात; कोण भरु शकतात हे फॉर्म?

ITR Filling 2025: आयटीआर फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. आता आयटीआर 1 आणि आयटीआर 4 ऑनलाइन पद्धतीने भरु शकतात. यासाठी प्रोसेस सुरु झाली आहे.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर 1 आणि आयटीआर 4 फॉर्म भरण्यास ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली आहे. याआधी ऑनलाइन पोर्टल सुरु झालं नव्हतं. मात्र, आता इन्कम टॅक्स विभागाने याबाबत माहिती दिली आहे. आता आयटीआर 1 आणि आयटीआर 4 ऑनलाइन पद्धतीने भरु शकतात.

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख यावर्षी वाढवून देण्यात आली आहे. १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर आयटीआर भरा.

ITR-1 फॉर्म कोणासाठी आहे? (ITR 1 Form For Who)

पगारातून मिळवलेले उत्पन्न, एका घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, इतर मार्गांमधून मिळणारे उत्पन्न, १.२५ लाखांपर्यंतचा भांडवली नफा असल्यास तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तसेच ५० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, ५००० रुपयांपेक्षा जास्त कृषी उत्पन्न, व्यवसाय किंवा फॅमिली बिझनेसमधून मिळणारा नफा. एकापेक्षा जास्त घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, लिस्टेड नसलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक, देशाबाहेर मालमत्ता असलेले, परदेशातील उत्पन्न असलेले करदाते ITR 1 फॉर्म भरु शकतात.

ITR 4 फॉर्म कोण भरु शकतात? (ITR 4 Form For Whom)

HUF किंवा भागीदारी फर्म्सना व्यवसायातून उत्पन्न मिळत असेल तर त्यांनी ITR 4 फॉर्म भरावा.आयकर कलम १९६१ अंतर्गत 44AE, 44DA, 44ADA अंतर्गत व्यवसायावर जर कर आकारणी निवडली गेली असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागतो.

आयटीआरचे एकूण ७ फॉर्म असतात. हे फॉर्म तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला भरायचे असतात. कर्मचाऱ्यांपासून ते बिझनेसमॅनपर्यंत प्रत्येकासाठी वेगवेगळे आयटीआर फॉर्म असतात. त्यामुळे तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला फॉर्म निवडायचे आहे. जर तुम्ही फॉर्म निवडताना चुक केली तर तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते. आयकर विभागाची नोटीसदेखील येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! ५ वर्षात मिळणार ३५ लाख रुपये; कसं? जाणून घ्या

Yavtmal Crime : यवतमाळमध्ये फुटबॉल खेळण्यावरून वाद, बंदुकीतून तीन फायर, तरुण गंभीर जखमी

Maharashtra Politics: दिल्ली दौऱ्यानंतर ठाकरेंची युती निश्चित? ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Live News Update: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर

Chanakya Niti : वाईट काळात कोणते कसे लोक मदत करतात?

SCROLL FOR NEXT