ITR Filling: आयटीआर फाइल करताना या ७ चुका कधीच करु नका, अन्यथा खिसा रिकामा होईल

ITR Filling Mistakes To Avoid: आयटीआर फाइल करताना विशेष काळजी घ्यायची असते. आयटीआर फाइल करताना या चुका कधीच करु नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होईल.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On

आयटीआर भरण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. आतापर्यंत अनेक करदात्यांनी आयटीआर फाइल केले आहेत. आयटीआर फाइल करण्याची मूदत वाढवली आहे. तरीही करदात्यांनी मुदत संपण्याची वाट पाहू नये. लवकरात लवकर आयटीआर फाइल करावा. आयटीआर फाइल करताना या चुका कधीच करु नका, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

ITR Filling
ITR Refund: मुदतीनंतर ITR फाइल केला तर रिफंड मिळणार नाही? आयकर विभागाने स्पष्टच सांगितलं

१. चुकीचा आयटीआर फॉर्म निवडू नका (Dont Use Wrong ITR Form)

आयटीआर भरताना फॉर्मची निवड करणे खूप गरजेचे असते. तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार फॉर्म भरायचे आहेत. एकूण ७ फॉर्म असतात. सॅलरीड करदात्यांपासून ते बिझनेसमॅनपर्यंत वेगवेगळे आयटीआर फॉर्म असतात.

2.फॉर्म 26AS आणि AIS कडे दुर्लक्ष करणे (Form 26AS, AIS)

प्रत्येक करदात्याला 26AS आणि AIS दिला जातो. हा फॉर्म आयकर विभागाच्या वेबसाइटवरच उपलब्ध असतो. हा फॉर्म अपलोड करण्यापूर्वी सर्व व्हेरिफिकेशन करावे.

३. उत्पन्नाची संपूर्ण माहिती

तुम्ही जर तुमच्या उत्पन्नाची खोटी माहिती दिली तर तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यामुळे सर्व उत्पन्नाची माहिती देणे गरजेचे आहे. यामध्ये व्याजदर किंवा टॅक्स लायबिलिटीचाही समावेश आहे.

४. बजेट २०२४ मधील बदल (Changes in ITR Filling)

यंदा बजेटमध्ये करदात्यांसाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही आयटीआर फॉर्ममध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे ते बदल समजून घेऊन मगच आयटीआर फॉर्म भरा.

५.सूट उत्पन्न वगळणे

तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची संपूर्ण माहिती आयटीआर फाइल करताना भरायची आहे. जरी तुमचे काही उत्पन्न करपात्र नसेल तरीही त्याची माहिती असणे गरजेचे आहे.

ITR Filling
ITR Filling: आयटीआर फाइल करताना 'या' चुका कधीच करु नका; येईल आयकर विभागाची नोटीस

६. जुन्या नियोक्त्याच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष करणे

एका आर्थिक वर्षात जर तुम्ही दोनदा नोकरी बदलली तर तेव्हा दोनदा सूट, कपातीचा दावा करतात. जेव्हा गुंतवणूकीची घोषणा दोन्ही नियोक्त्यांकडून होते तेव्हा तुम्हाला मूलभूत सूट, स्टँडर्ड डिडक्शन, VI-A लागू केले जाऊ शकते. यामुळे टीडीएसमध्ये सूट मळू शकते.

७. HRA मध्ये त्रुटी

जर एचआरए सूटसाठी तुम्ही खोटे दावे केले तर तुम्हाला दंड होऊ शकतो. ज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने नोंदवलेल्या रक्कमेच्या २०० टक्के दंड आकारला जाईल.

ITR Filling
ITR Filling: आयटीआर कसा फाइल करावा? ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com