Itel ColorPro 5G Saam Digital
बिझनेस

itel ColorPro 5G Launch : रंग बदलणारा 5G स्मार्ट फोन पाहिलाय का? जबरदस्त फिचर्स, किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्यात

Colour Changing Mobile : Itel ने ग्राहकांसाठी नवीन Itel ColorPro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कलर चेंजिंग बॅक पॅनल, 12 जीबी रॅम ९९९९ रुपयांमध्ये कलर चेंजिंगचाही अनुभव घेता येणार आहे.

Sandeep Gawade

बाजारात 10,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये 5G स्मार्टफोन सहज उपलब्ध उपलब्ध होतात, पण कधी रंग बदणारा स्मार्ट फोन पाहिला आहे का? तोही ९९९९ रुपयांमध्ये. Itel ने ग्राहकांसाठी नवीन Itel ColorPro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कलर चेंजिंग बॅक पॅनल व्यतिरिक्त, या फोनमध्ये 12 जीबी रॅमही आहे. ग्राहकांना कमी किंमतीत उत्कृष्ट फिचर्ससह कलर चेंजिंगचाही अनुभव घेता येणार आहे.

हा कलर चेंजिंग itel स्मार्टफोन Lavender Fantasy आणि River Blue कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. कमी किमतीत लॉन्च करण्यात आलेल्या या फोनमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत आणि हा फोन खरेदी करताना तुम्हाला कोणत्या ऑफर्स मिळतील? पाहूयात..

Itel ColorPro 5G स्मार्टफोनची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. या किमतीत तुम्हाला या हँडसेटचा 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. कंपनी फोनसोबत 1 वर्षाची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी देत ​​आहे.याशिवाय तीन हजार रुपये किमतीची ट्रॉली बॅगही देण्यात येणार आहे. पण या दोन्ही मर्यादित कालावधीच्या ऑफर आहेत. १०० दिवसांच्या आत तुम्ही हा फोन खरेदी केला तरच याचा लाभ घेता येणार आहे.

डिस्प्ले: या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच HD Plus डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 6080 ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

बॅटरी क्षमता: 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 mAh ची शक्तिशाली बॅटरी वापरण्यात आली आहे.

कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेल AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

रॅम: फोनमध्ये 6 जीबी रॅम असली तरी 6 जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 12 जीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT