Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दोन बहि‍णींची कमाल! परिस्थिती बेताची, त्यात त्सुनामीत घर गेलं; एक IAS तर दुसरी IPS; ईश्वर्या आणि सुष्मिताचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of Ishwarya And Sushmita Ramnathan: तमिळनाडूच्या दोन बहिणींनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. एक आयएएस तर दुसरी आयपीएस अधिकारी झाली आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवसरात्र एक करुन मेहनत करावी लागते. अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. कितीही वाईट परिस्थिती असली तरीही त्यावर जो व्यक्ती मात करतो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच यश ईश्वरच्या आणि सुष्मिता रामनाथन यांना मिळालं आहे. दोन्ही बहि‍णींनी आपल्या आईवडिलांचे नाव खूप मोठे केले आहे. (Success Story)

ईश्वर्या या आयएएस अधिकारी झाल्या आहेत तर सुष्मिता या आयपीएस अधिकारी झाल्या आहेत. त्या मूळच्या तामिळनाडूच्या कुड्डुलोर जिल्ह्यातील रहिवासी. त्यांनी लहानपणापासूनच खूप संघर्ष केला. २००४ रोजी आलेल्या हिंदी महासागरातील त्सुनामीत त्यांना आपलं घर गमवावं लागलं.

ईश्वर्या आणि सुष्मिता यांची आर्थिक परिस्थिती लहानपणी बिकट होती. त्यांनी गरिबीला मागे टाकून यश मिळवले आहे.या दोघींनी आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. दोघांनीही यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यात यश मिळवले. (Success Story of IAS And IPS Sisters)

IAS ईश्वर्या रामनाथन

ईश्वर्या रामनाथन यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत ६२८ रँक मिळवली. त्यानंतर त्यांची रेल्वेत निवड झाली. परंतु त्यांनी आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी ४४ रँक मिळवली.

IPS सुष्मिता रामनाथन

IPS सुष्मिता रामनाथन यांनीही यूपीएससी परीक्षा दिली. त्यांना पहिल्या पाच प्रयत्नात अपयश मिळाले. त्यांनी हार मानली नाही त्यांनी पुन्हा परीक्षा दिली.त्यानंतर त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT