IRCTC Rule Change Saam tv
बिझनेस

IRCTC चा नवा नियम! आता कॅन्सलेशन चार्ज न देता बुक करता येणार दुसऱ्या दिवशीचं तिकीट; प्रवाशांना काय होणार फायदा?

IRCTC New Rule: आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरु आहे. आता तुम्ही जर ट्रेनचं तिकीट कॅन्सल केले तर कोणत्याही कॅन्सलेशन चार्जशिवाय दुसऱ्या दिवशीचं तिकीट काढता येणार आहे.

Siddhi Hande

दिवाळी सुरु होणार आहे. त्यामुळे अनेकजण आपापल्या गावी जायची तयारी करत आहेत. अनेकजण लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात. दरम्यान, आता ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आयआरसीटीसीने रेल्वेत नवीन सुविधा सुरु केली आहे.यामुळे लाखो प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

आता प्रवासी कोणत्याही कॅन्सलेशन चार्जसह तुमच्या प्रवासाची तारीख बदलू शकतात. आता तुम्ही आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा अॅपद्वारे कन्फर्म तिकीट रद्द करुन तुम्ही त्याची तारीख बदलू शकतात. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. याआधी तुम्ही तिकीट कॅन्सल करुन दुसऱ्या दिवशीचे तिकीट घेत असाल तर त्यासाठी शुल्क भरावे लागत होते.

काय आहेत नियम?

जर प्रवाशांची काही कारणामुळे तुमची ट्रेन सुटली तर तुम्हाला रिफंड मिळत नाही. ट्रेन उशिरा असणे, खराब वातावरण किंवा आपत्कालीन परिस्थितीत जरी ट्रेनने प्रवास करु शकला नाही तर तुमचे तिकीटाचे पैसे जप्त केले जातील. तसेच प्रवास सुरु होण्याआधी जर तुम्ही तिकीट कॅन्सल केले तर क्लास आणि कॅन्सलेशनच्या वेळेनुसार तुम्हाला दंड भरावा लागेल.

नवीन सुविधा कशी असणार?

मिडिया रिपोर्टनुसार, या नवीन सुविधेनुसार आता तुम्हाला तिकीट कॅन्सर आणि दंड भरण्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही दिवशीचे तिकीट बुक करण्याचा पर्याय दिसेल. तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन हे तिकीट बुक करु शकतात.

काय फायदा होणार?

लांबचा प्रवास करताना अनेकदा शेवटच्या क्षणी काही काम आल्यास तुम्ही तिकीट रद्द करु शकतात. त्याऐवजी दुसऱ्या दिवशीचे तिकीट बुक करु शकतात. यामुळे तुमचे तिकीटाचे पैसेदेखील बुडणार नाही. याचसोबत तुम्हाला हवा त्या दिवशी तुम्ही प्रवास करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT