Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडील वीट भट्टीत कामाला, आई धुणीभांडी करायची, लेक २२व्या वर्षी झाला IPS; सफीन हसन यांचा प्रवास

Success Story of IPS Safin Hasan: आयपीएस सफीन हसन यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी खूप खडतर परिस्थितीतून हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

IPS सफीन हसन याांनी वयाच्या २२ व्या वर्षी क्रॅक केली UPSC

वडील वीट भट्टीवर कामाला तर आई दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायची

परीक्षेच्या काळातच झाला होता अपघात

प्रत्येकाची परिस्थिती ही काही चांगली नसते. काही जणांची परिस्थिती खूपच बिकट असते. परंतु ही परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये असते. जर तुम्ही परिस्थिती बदलली तर तुमचं संपूर्ण आयुष्यचं बदलतं.असंच काहीसं सफीन हसन यांनी केलं. खूप गरीब कुटुंबात बालपण गेलं. परंतु त्यांनी आज आपली परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ते आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सफीन हसन कोण आहेत? (Who is IPS Safin Hasan)

संघर्ष, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. सफीन हसन यांचा जन्म १९९५ रोजी गुजरातमधील पालनपूर येथे झाला. त्यांचे बालपण खूप बिकट परिस्थितीत गेले. त्यांचे वडील विट भट्टीत काम करायचे तर आई दुसऱ्यांचा घरी भांडी घासायचे काम करायचे. याचसोबत रात्री ते लोक अंड्याची गाडी लावायचे.

सफीन हसन यांचे शिक्षण गावातच झाले. सफीन हे अभ्यासात इतके हुशार होते की त्यांच्या शिक्षणाचा खर्च शाळेने उचलला. त्यानंतर त्यांनी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे स्वप्न देशसेवा करायचे होते. यासाठी त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना दिवसरात्र एक करावी लागते. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यांनी २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी परीक्षेत ५७०वा रँक मिळवला. ते सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

परीक्षेच्या काळात झाला होता अभ्यास

सफीन हे खूप हुशार होते. परंतु एकदा त्यांचा अपघात झाला. २०१७ मध्ये परीक्षा द्यायला जाताना त्यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. परंतु त्यांनी त्याच परिस्थितीत परीक्षा दिली. याच मेहनतीचे त्यांना यश मिळाले. ते वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आयपीएस अधिकारी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT