iPhone 17  Saam Tv
बिझनेस

iPhone 17 सीरीज लाँच; भारतात किंमत किती? फिचर्स आणि कॅमेराबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Apple iPhone 17 Launch Price: आयफोन 17 सीरीज लाँच झाली आहे. या सीरीजमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळणार आहे. या आयफोनची किंमत किती वाचा सविस्तर.

Siddhi Hande

iPhone 17 सीरीज लाँच

iPhone 17 ची भारतात किंमत किती?

फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटीबद्दल संपूर्ण माहिती

अॅपलचा बहुप्रतिक्षित iPhone 17 फोन लाँच झाला आहे. काल रात्री Awe Dropping इव्हेंटमध्ये आयफोन 17 सीरीज लाँच करण्यात आली आहे. यामध्ये अॅपल कंपनीने आयफोनसह अनेक स्मार्टवॉचदेखील लाँच केले आहेत. या आयफोन सीरीजमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहे. उत्तम क्वालिटीचा कॅमेरा, डिस्प्लेसोबत स्टोरेज ऑप्शनदेखील देण्यात आले आहे.

आयफोन 17ची बुकिंग कधी सुरु होणार? (iPhone 17 Booking Date )

या सर्व आयफोनमध्ये Intelligence लेन्स आहेत. जे AI च्या मदतीने आयफोनला अजूनच स्मार्ट बनवते. या आयफोनची प्री बुकिंग १२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हा आयफोन १९ सप्टेंबर २०२५ पासून जवळच्या दुकानात उपलब्ध होणार आहे.

iPhone 17 ची किंमत (iPhone 17 Price)

अॅपलच्या iPhone 17 ची भारतात सुरुवातीची किंमत ₹79,900 आहे. यामध्ये 256GB स्टोरेज बेस मॉडेल आहे. याचसोबत 512GBचादेखील ऑप्शन देण्यात आला आहे. या iPhone 17 मध्ये ब्लॅक, व्हाइट, ब्लू, सेज आणि पर्पल कलर उपलब्ध आहेत.

या फोनमध्ये ६.३ इंचाचा ProMotion डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि Always-On स्क्रीन दिली आहे. यामध्ये A19 चिप देण्यात आली आहे. यामध्ये मागील बाजूला 48MPचा प्रायमरी कॅमेरा आणि टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरादेखील अपग्रेड झाला आहे. या आयफोनची खासियत म्हणजे तुमचा फोन फक्त ४० मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.

iPhone Air ची किंमत (iPhone Air Price)

अॅपल iPhone Airची किंमत १,१९,९०० रुपये आहे. यामध्ये 512GB आणि 1TB स्टोरेज ऑप्शन आहेत. यामध्ये स्पेस ब्लॅक, व्हाइट क्लाउड, लाइट गोल्ड, स्काय ब्लू असे कलर ऑप्शन आहेत.

iPhone 17 Pro फिचर्स आणि किंमत (iPhone 17 Pro Features And Price)

अॅपल iPhone 17 Pro ची किंमत १,३२,९०० रुपये आहे. यामध्ये 512GB आणि 1TB स्टोरेज मिळते. यामध्ये कॉस्मिक ऑरेंज, डीप ब्लू, सिल्वर कलर ऑप्शन आहे. या फोनमध्ये Ceramic Shield 2 प्रोटेक्शन आणि अॅल्युमिनियम बॉडी मिळणार आहे. यामध्ये A19 Pro चिप आणि वाष्प कूलिंग सिस्टीम मिळणार आहे. फोन गेमिंक आणि AIदेखील असणार आहे. याचसोबत ३ कॅमेरेदेखील मिळणार आहे. 48MP कॅमेरा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात नवीन घर किंवा कार घ्यायचा विचार करताय? त्याआधी ही बातमी वाचाच

Shocking: कॅब चालकाचे अश्लील कृत्य, धावत्या कारमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन; नंतर...

Prajakta Mali: मोकळे केस अन् ते आरस्पानी सौंदर्य, प्राजक्ताच्या फोटोशूटने केलाय कहर

Shoicking : चित्रपट पाहताना बायकोला सस्पेन्स सांगत होता, शेजारी बसलेले संतापले, चित्रपटगृहात राडा अन् हाणामारी

Agra Fort History: भारताच्या इतिहासातील आग्रा किल्ल्याचे स्थान आणि सांस्कृतिक वारसा, वाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT