Investment Tips  Saam Tv
बिझनेस

Investment Tips: पहिलाच जॉब आहे? मग आर्थिक गुंतवणूकीसाठी हे पर्याय आहेत बेस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याच्या काळात आर्थिकदृष्ट्या बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. आयुष्यात आर्थिक अडचण येऊ नये यासाठी आतापासूनच योग्य पाऊले उचलली पाहिजे. तुम्ही तुमच्या पहिल्या नोकरीपासूनच बचत करा. जेणेकरुन अडचणीच्या काळात हे पैसे तुमच्या कामाला येतील. आज आम्ही तुम्हाला नोकरीच्या सुरुवातीपासूनच बचत कशी करावी, याबाबत माहिती देणार आहोत.

तुम्हाला पहिली नोकरी मिळताच गुंतवणूक करणे शहाणपणाचे आहे. तुम्हाला महिन्याचा खर्च भागवून योग्य ठिकाणी पैसे वाचणे हे कळायला हवे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बजेट प्लान करावा लागेल. यामध्ये तुमचा रोजचा खर्च आणि त्यातून किती रुपयांची बचत करायची आहे, याचे प्लानिंग करावे लागेल.

खर्च आणि बचत याचे प्लानिंग करा

तुम्ही तुमचा पगार येण्याच्या आधीच खर्चाचे प्लानिंग करा. त्यानंतर ज्या पैशांची बचत करायची आहे, ते पैसे बाजूला काढून ठेवा. त्या अनुशंगाने तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च करा.

SIP

नवीन नोकरी लागल्यावर तरुणांनी सुरुवातीच्याच काळात म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करावे. एसआयपीमध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम गुंतवावी लागते. या रक्कमेवर तुम्हाला काही वर्षांनी चांगले व्याज मिळते.

एफडी

तुम्ही तुमच्या भविष्यासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करु शकतात. एफडीमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. या एफडीमध्ये तुमचे पैसे सुरक्षित असतात.या पैशांवर तुम्हाला एक ठरावीक व्याज मिळते. काही वर्षानंतर तुम्ही हे पैसे काढू शकतात.

सरकारी योजना

सरकारी योजना या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी राबवल्या जातात. जर तुम्हाला भविष्यात कोणता व्यवसाय करायचा असेल तर या योजनांमध्ये तुम्हाला कमी व्याजदरावर कर्ज मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT