NPS Scheme Saam Tv
बिझनेस

NPS मध्ये गुंतवणूक करा अन् महिन्याला १ लाख रुपयांची पेन्शन मिळवा, योजना आहे तरी काय?

National Pension Scheme: नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर १ लाख रुपयांनी पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते.आपल्या भविष्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. रिटायरमेंटनंतर रेग्युलर उत्पन्न मिळण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करा. तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला १ लाख रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणार आहे.

एनपीएस योजना आहे तरी काय? (What Is NPS Scheme)

नॅशनल पेन्शन योजना ही मार्केटशी लिंक असते. या योजनेत कोणतेही सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे कर्मचारी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार आहे. या योजनेत कर्मचारी आणि कंपनीकडून पैसे जमा केले जातात. या योजनेत मार्केट बेस्ड रिटर्न मिळते.

एनपीएस अकाउंट पोर्टेबल आहे. ते देशातून कुठूनही तुम्ही सुरु करु शकतात.या योजनेत तुम्ही रिटारयमेंटनंतर डिपॉझिटच्या ६० टक्के रक्कम काढू शकतात. तर ४० टक्के रक्कम तुम्हाला पेन्शन स्वरुपात मिळणार आहे. या योजनेत तुम्ही टियर १ आणि टियर २ अकाउंट उघडू शकतात.

या योजनेत तुम्ही ६० टक्के रक्कम एकरकमी काढू शकतात. तर ४० टक्के अॅन्युटी पेन्शन म्हणून मिळतात.

प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ३५ वर्षांची असताना इक्विटीमध्ये जास्त एक्सपोजर मिळतो. हे एक्सपोजर ७५ टक्के असणार आहे. तर ६० वर्षांच्या नागरिकांना ५० टक्क्यांपर्यंत एक्सपोजर मिळणार आहे.

या योजनेत तुम्ही जर ४० वर्षांचे असताना गुंतवणूक केली तर १ लाख रुपायांची पेन्शन मिळवू शकते. २० वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला २० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

या योजनेत जर १० टक्के जरी रिटर्न मिळाले तरी २० वर्षानंतर ३ कोटी २३ लाख रुपये मिळणार आहे. यातील रिटर्न १.८५ कोटी रुपये असणार आहे. तर गुंतवणूक १.३७ कोटी रुपये आहे. या योजनेत तुमचा टॅक्स ४१.२३ लाख रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला १.६२ रुपये एकरकमी मिळणार आहे. तर १ लाख रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT