Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, UPSC परीक्षेत दुसरी रँक; IAS अक्षत जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Akshat Jain: आयएएस अक्षत जैन यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी आयआयटीमधून इंजिनियरिंग केले. तरीही त्यांनी प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

देशातील लाखो तरुणांचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते. आयएएस, आयपीएस ऑफिसर होण्यासाठी यूपीएससी परीक्षा दिली जाते. यूपीएससी परीक्षा क्रॅक करणे खूप अवघड आहे. आयएएस अक्षत जैन यांनीही सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे आई-वडिल दोघेही प्रशासकीय अधिकारी होते. त्यांना लहानपणापासूनच घरातून सपोर्ट मिळाला. याचसोबत कुटुंबाच्या जास्त अपेक्षादेखील होत्या. अक्षत यांनी कुटुंबाच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या अन् आयएएस अधिकारी झाले. (Success Story Of IAS Akshat Jain)

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. आयएएस अक्षत जैन यांना यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आले. परंतु त्यांनी पुन्हा डबल मेहनत केली आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

अक्षत जैन यांनी जयपुरमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयआयटी गुवाहाटीमधून बीटेक केले. त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. परंतु पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. अक्षत जैन हे फक्त २ गुणांनी यूपीएससी परीक्षेतच अयशस्वी ठरले. (IAS Akshat Jain Success Story)

आयुष्यात अपयश आले तरीही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले.एक वर्ष वाया गेल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. आयआयटीमधून पासआउट झाल्यावर त्यांनी बंगळुरु येथे आय अँड डी इन्स्टिट्यूटमध्ये काही दिवस नोकरी केली.

यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आयएएस अक्षत जैन यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी स्पर्धा परीक्षेत दुसरी रँक मिळवली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांना अपयश येऊनदेखील त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT