Infosys Salary Hike Saam tv
बिझनेस

Infosys Salary Hike: नारायण मूर्तींच्या इन्फोसिसमध्ये घसघशीत पगारवाढ; किती टक्के? जाणून घ्या

Infosys Salary Hike 2025: इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा कंपनीने केली आहे.

Siddhi Hande

आयटी क्षेत्रातील नावाजलेली इन्फोसिस कंपनी ही नेहमीच चर्चेत असते. कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आठवड्यात ७२ तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल करण्यात आले आहेत. दरम्यान, आता यंदा इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळणार आहे. (Infosys Salary Hike 2025)

इन्फोसिस कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना ६ ते ८ टक्क्यांची वाढ देण्यात येणार आहे. जानेवारी आणि एप्रिल या दोन टप्प्यांमध्ये ही वेतनवाढ दिली जाणार आहे.

इन्फोसिस कंपनीने यंदा चांगलीच महसूल वाढ नोंदवली होती. कंपनीने आर्थिक वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यात ११ टक्के महसूल वाढ केली होती. कंपनीने ६,८०६ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. (Salary Hike Of Infosys Employees)

इन्फोसिस कंपनी दोन टप्प्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहे. यात जानेवारीत लेव्हल ५ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात लेव्हल ६ कर्मचाऱ्यांना मार्चपासून वेतनवाढ करण्यात येणार आहे.

लेव्हल ५ मध्ये इंजिनियर, सिनियर इंजिनियर, सिस्टीम इंजिनियरचा समावेश होते. तर लेव्हल ६ मध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर, सिनियर डिलिव्हरी मॅनेजर पदांचा समावेश होतो.

याबाबत इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी जयेश संघराजका यांना माहिती दिली आहे. आम्ही ६-८ टक्क्यांच्या पगारवाढीची अपेक्षा करत आहोत. तर परदेशात मागील वर्षानुसारच वेतनवाढ होणार आहे. त्यामुळे भारतातील कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्त वाढ होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांना ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. परंतु यानंतर सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर एल अँड टीचे सीईओ सुब्रमण्यम यांनीदेखील आठवड्यात ९० तास काम करण्याचा सल्ला दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT