वंदे भारत स्लीपर व अमृत भारत गाड्यांमध्ये कन्फर्म बर्थची हमी
तिकीट रद्द केल्यास जास्त रद्दीकरण शुल्क आकारले जाते
सामान्य गाड्यांपेक्षा रद्दीकरण नियम वेगळे
भारतीय रेल्वे जलद,आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देत आहे, त्यामुळे प्रवाशांच्या कल रेल्वेनं प्रवास करण्याकडे वाढलाय. त्यामुळे आपण सर्वांना रेल्वेचे नियम माहिती असणं आवश्यक आहे. रेल्वेने सेमी-हाय-स्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि अमृत भारत एक्सप्रेस सुरू केली आहे.
देशाच्या विविध भागात धावणाऱ्या या गाड्या त्यांच्या लूक आणि वेगामुळेच चर्चेत आहेत. यासह यात उपलब्ध असलेल्या प्रीमियम सुविधांमुळे या दोन्ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत. पण या गाड्यांमध्ये प्रवास करण्यापूर्वी या रेल्वेचे नियम माहिती करून घेणं आवश्यक आहे. तिकीट रद्द करण्याची व्यवस्था सामान्य गाड्यांपेक्षा खूपच वेगळी आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार, वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत गाड्यांमध्ये तिकिटे रद्द केल्यास प्रवाशांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. जर तुम्ही ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या ७२ तास आधी तुमचे तिकीट रद्द केले तर एकूण तिकिटाच्या रकमेच्या २५टक्के रक्कम रद्दीकरण शुल्क म्हणून वजा केली जाते. म्हणजेच काय तुमचे तिकीट वेळेवर रद्द केले तरी तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे मिळणार नाहीत. तसेच जर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या ८ ते ७२ तास आधी तुमचे तिकीट रद्द केले तर नुकसान आणखी जास्त होईल. या परिस्थितीत रेल्वे तुमच्या तिकिटाच्या रकमेतून ५० टक्के रक्कम कापून घेतली जाईल.
दरम्यान सर्वात मोठं नुकसान तेव्हा होते, जेव्हा एखादा प्रवासी ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ८ तासांच्या आत तिकीट रद्द करतो. रेल्वेच्या नियमांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे, की जर तुम्ही या वेळेच्या आत तुमचे तिकीट रद्द झाले तर तुम्हाला एकही पैसा परत मिळणार नाही. याचा अर्थ संपूर्ण तिकिटाची रक्कम जप्त केले जातात.
रेल्वे मंत्रालयाच्या मते, शेवटच्या क्षणी तिकीट रद्द केल्याने सीट रिकाम्या राहतात, तशी स्थिती होऊ म्हणून नियम कडक आहेत. या गाड्यांमधील प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म बर्थची हमी दिली जाते. म्हणूनच वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत गाड्यांसाठी रद्द करण्याचे नियम इतर मेल, एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांच्या तुलनेत अधिक कडक आहेत. अमृत भारत एक्सप्रेसच्या आरक्षित तिकिटांनाही तेच नियम लागू होतात जे वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी लागू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.