Indian Railways introduces new rules for Tatkal and counter ticket booking – Here’s what passengers must know. Saam Tv News
बिझनेस

Indian Railway: तत्काळ अन् काउंटर तिकीट बुकिंगबाबत रेल्वेचे नवे नियम

Train Ticket Booking Rules: रेल्वे विभागाने तिकीट बुकिंगच्या नियमात काही बदल केली आहेत. रेल्वे तिकिटे बुक करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे का? काउंटरवरून तिकिटे बुक करण्यासाठी आधार कार्ड दाखवावे लागेल का? अशी प्रश्न या नव्या नियमांमुळे निर्माण झाली आहेत.

Bharat Jadhav

  • भारतीय रेल्वेने तत्काळ व काउंटर तिकीट बुकिंगसाठी नवे नियम जाहीर केलेत.

  • सर्वसाधारण बुकिंगसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही.

  • तत्काळ तिकिटांच्या बुकिंगसाठी वेळेची मर्यादा व प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास खूप सोयीस्कर आहे, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे उत्तम पर्याय आहे. पण प्रवाशांना तिकीट बुक करताना अनेकदा अडचणी येतात. रेल्वेने तिकीट बुकिंगबाबत काही नियम नव्याने तयार करण्यात आली आहेत.

सर्व प्रवाशांनी हे नियम पाळले पाहिजेत. नुकतेच रेल्वेने नवीन नियम लागू केलेत. यात रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. याचा ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि ओव्हर-द-काउंटर तिकीट बुकिंगवर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊ.

भारतीय रेल्वेने १ जुलैपासून तत्काळ ट्रेन बुकिंगचे नियम बदलले आहेत. आधी फक्त आधार प्रमाणीकरण युझर्सला तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी होती. पण आता १ ऑक्टोबरपासून, नियमित तिकिटे बुक करण्यासाठी देखील आधार आवश्यक असणार आहे. तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांसाठी, फक्त आधार प्रमाणीकरण युझर तिकिटे बुक करू शकतील.

सकाळी ८ ते ८:१५ दरम्यान ऑनलाइन तिकिटे बुक करण्यासाठी आधार आवश्यक असणार आहे. याचाच अर्थ ज्यांच्या आयआरसीटीसी खात्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, तेच सकाळी ८ ते ८:१५ दरम्यान तिकिटे बुक करू शकतील.

रेल्वे काउंटरवरही आधार आवश्यक आहे का?

नवीन रेल्वे नियमांनुसार, ऑनलाइन तिकीट बुक करताना प्रवाशांना आधार कार्डचा वापर अनिवार्य असेल. पण काउंटरवरून तिकिटे बुक करण्यासाठी आधार आवश्यक नसेल. रेल्वेने याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र दाखवणं अनिवार्य केलेले नाहीये. म्हणजेच काउंटरवरून तिकिटे बुक करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार किंवा इतर कोणतेही ओळखपत्र दाखवण्याची आवश्यकता नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

Sleeping: गरजेपेक्षा जास्त झोपण्याचा आरोग्यावर होतो परिणाम, होतील 'हे' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT