Railway Refund Rule Saam Tv
बिझनेस

Railway Refund Rule: रेल्वेच्या नियमात मोठा बदल, तिकीट रद्द केल्यास मिळणार नाही रिफंड

Vande Bharat-Amrit Bharat Express Railway Ticket Refund Rule Policy: वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसच्या तिकिट रिफंडच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. आता ८ तास आधी तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही.

Siddhi Hande

रेल्वे तिकीट रिफंडच्या नियमात बदल

वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसच्या तिकीट बुकिंगमध्ये बदल

आता ८ तास आधी तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही

भारतीय रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसच्या तिकीटसंदर्भातील नियमात बदल केले आहेत. आता वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेसच्या तिकीट रद्द करण्याचे आणि रिफंडचे नियम अजूनच कडकच केले आहे.

वंदे भारत आणि अमृत भारतच्या प्रिमियम रेल्वेच्या तिकीट रिफंडचे नियम बदलले आहे. आता या रेल्वे सुटण्याच्या आधी ८ तासांपूर्वी कन्फर्म केलेले तिकिट रद्द केल्यानंतर प्रवाशांना परतावा मिळणार नाहीये. इतर रेल्वेसाठी नियम वेगळे आहेत. सामान्य रेल्वे, एक्सप्रेस रेल्वे सुटण्याच्या ४ तास आधीपर्यंत परतावा दिला जातो. परंतु आता वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेस सुटण्याच्या ८ तास आधी तिकीट रद्द केले तर रिफंड मिळणार नाहीये.

तिकीट रिफंडचे नियम (Vande Bharat and Amrit Bharat Express Ticket Booking Rule)

याआधी जेव्हा तुम्ही ट्रेन सुटण्याच्या ७२ तासांपर्यंत तिकीट रद्द करायचे तेव्हा २५ टक्के शुल्क भरावे लागायचे. ७२ ते ८ तासांदरम्यान जर तुम्ही तिकीट रद्द केले तर ५० टक्के रिफंड शुल्क भरावे लागायचे. अमृत भारत आणि वंदे भारतचे रिफंड शुल्क इतर ट्रेनपेक्षा जास्त आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन नियम प्रिमियम स्वरुपाशी आणि ऑपरेशनल रचनेशी जोडले आहे. वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत या ट्रेन १०० टक्के कन्फर्म बर्थसह चालतात. यामुळे कोणतेही RAC किंवा वेटिंग लिस्टमधील तिकीटे दिली जात नाही. सर्व प्रवाशांना बुकिंगची हमी दिली जाते. यामुळे जर शेवटच्या क्षणी कोणी तिकीट रद्द केले तर रेल्वेला फटका बसतो. कोणीही तिकीट बुक करत नाही. त्यामुळेच हे नियम लागू केले आहे.

अमृत भारत II सुरु

देशातील पहिली अमृत भारत स्लीपर कोच ट्रेन सुरु करण्यात आली आहे. अमृत भारत II जानेवारी २०२६ पासून सेवेत दाखल केली आहे. या ट्रेनबाबतच्या रिफंडच्या नियमात बदल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाआधीच 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला; किती होणार फायदा?

Maharashtra Live News Update: सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र

Sangli : नर्सरीमध्ये अग्नितांडव, नवरा वाचला, बायकोचा संशायस्पद मृत्यू, सांगलीमध्ये खळबळ

HSRP नंबरप्लेट न बसवल्यास होणार दंड; परिवहन विभागाची कारवाई

Vastu Tips: घरात सतत भांडणं आणि मतभेद वाढतायत? वास्तूशी संबंधित हे उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT