Railway  Saam Tv
बिझनेस

Railway Ticket: रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर; तिकीट दरात मिळणार सवलत?

Railway Ticket Concession For Senior Citizen: रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Siddhi Hande

रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक अनेकदा रेल्वेने प्रवास करत असतील तर त्यांना आता रेल्वे तिकिटात सवलत मिळणार आहे. कोविडच्या काळात रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी तिकीटावरील सूट बंद केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चार वर्षानंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीटाच्या किंमती कमी होणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीटांच्या किंमतीत सवलत दिली जाऊ शकते. एसी कोचऐवजी स्लीपर कोचससाठी ही सूट देण्यात येणार आहे, असं सांगण्यात येत आहे. स्लीपर कोचमध्ये प्रवास करत असलेले प्रवासी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच स्लीपर कोचमधून प्रवास करणाऱ्या लोकांना आता तिकीटावर सवलत मिळणार आहे.

ज्या लोकांना या सवलतीचा फायदा घ्यायचा असेल त्यांना रिझर्व्हेशन फॉर्म भरताना सवलतीचा कॉलम भरावा लागणार आहे. यामध्ये तुमच्या वयानुसार सवलत मिळणार नाहीये. जेव्हा तुम्हा रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये सवलत या कॉलमवर क्लिक कराल तेव्हाच त्यांना सूट मिळणार आहे. प्रत्येक प्रवाशाला वर्षातून दोन ते तीन वेळा ही सूट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोविड आधीच्या नियमांनुसार, एसी कोच आणि स्लीपर कोचमधून प्रवास करण्यावर ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली होती.

कोविडआधी ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना ४० टक्के सूट देण्यात येत होती. तर ५८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना ५० टक्के सूट मिळत होती. कोरोननंतर ही सूट बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता लवकरच पुन्हा एकदा सूट देण्यात येणार आहे, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT