IRCTC Rule: सावधान! IRCTC आयडीवरुन मित्राचे तिकीट बुक करताय? जेलमध्ये जावं लागू शकतं; जाणून घ्या नियम

IRCTC Rules For Ticket Booking: आयआरसीटीसी आयडीवरुन मित्राचे तिकीट बुक करणे महागात पडू शकते. जर तुम्ही मित्राचे तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
IRCTC Rule
IRCTC RuleSaam Tv
Published On

पावसाळा सुरु झाला आहे. अनेकजण पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. फिरायला जाताना ट्रेनचा प्रवास अनेक लोक करतात. ट्रेनच्या प्रवासात बाहेरील सुंदर निसर्गाचे दर्शन होते. ट्रेनचा प्रवास करण्यासाठी आयआरसीटीसी अॅपवरुन तिकीट बुक करतात. आयआरसीटीसी खात्यावरुन जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही तुमच्या मित्राचे किंवा अजून कोणाचे तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.

जर तुम्ही तुमच्या आयआरसीटीसी अकाउंटवरुन तुमच्या मित्राचे तिकीट बुक केले तर तुम्हाला ३ वर्षांचा तुरुंगवास आणि १०००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तिकीट बुक करण्याआधी आयआरसीटीसीचे नियम माहित असणे गरजेचे आहे.

IRCTC Rule
BMW ची नवीन EV Scooter CE 04 'या' दिवशी होणार लॉन्च, याच्या किंमतीत खरेदी करता येईल दोन कार

वैयक्तिक आयडीवरुन दुसऱ्या व्यक्तीचे तिकीट बुक करणे गुन्हा

रेल्वे कायदा कलम १४३ नुसार, तुम्ही तुमच्या आयआरसीटीसी अकाउंटवरुन स्वतः चेच रेल्वे तिकीट बुक करु शकतात. त्यामुळे तुम्ही जर दुसऱ्या व्यक्तीचे तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

एकच आडनाव असलेल्या लोकांची तिकीट बुक केली जातात

एखादा व्यक्ती फक्त आपल्या कुटुंबातील इतर लोकांची तिकीटे बुक करु शकतो. आरआरसीटीसीवर समान आडनाव असलेल्या लोकांचीच तिकीटे बुक करु शकतात. तुम्ही तुमच्या मित्राचे तिकीट बुक करत असाल तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते.

तिकीट बुक करण्याची वेळ

आयआरसीटीच्या वेबसाइट किंवा अॅपवरुन तिकीट बुक करण्याची एक योग्य वेळ असते. तुम्हाला जर एसी ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही सकाळी १० वाजल्यापासून करु शकतात. नॉन- एसी ट्रेनचे तिकीट ११ वाजल्यापासून बुक करु शकतात. तसेच आयआरसीटीच्या वेबसाइटवर एका युजर आयडीने एका महिन्यात २४ तिकीटे बुक करु शकतात. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन तिकीट बुक करण्यासाठी तुमचे आधार कार्ड युजर आयडीशी लिंक असणे गरजेचे आहे.

IRCTC Rule
Petrol Diesel Price : खुशखबर! पेट्रोल-डिझेल तब्बल २० रुपयांनी स्वस्त होणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आयआरसीटीसीवरुन तिकीट कसे बुक करावे

सर्व प्रथम आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन लॉग इन करा. त्यानंतर बुक तिकीट या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला कुठून कुठे जायचे आहे त्याची माहिती भरा. यानंतर प्रवासाची तारीख निवडा.यानंतर कोणत्या क्लासमधून प्रवास करायचा आहे तो पर्याय निवडा. यानंतर Book Now या पर्यायावर क्लिक करा.यानंतर प्रवाशांची माहिती, मोबाईल नंबर अशी आवश्यक माहिती भरा.

IRCTC Rule
Arunachal IRCTC Package: अरुणाचल प्रदेशमध्ये ८ दिवस फिरा, फ्रीमध्ये खाण्याची अन् राहण्याची सोय, वाचा IRCTC नवं पॅकेज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com