IND vs BAN,Super 8: बांगलादेशला हरवूनही सेमीफायनलचं तिकीट मिळणं कठीण! टीम इंडियासाठी असं असेल समीकरण

India vs Bangladesh, Semi Final Scenario: भारतीय संघाने जर बांगलादेशला पराभूत केलं, तर सेमीफायनलचं तिकीट मिळणार का? वाचा कसं असेल समीकरण?
IND vs BAN,Super 8: बांगलादेशला हरवूनही सेमीफायनलचं तिकीट मिळणं कठीण! टीम इंडियासाठी असं असेल समीकरण
indian cricket teamtwitter
Published On

भारतीय संघाने सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता.

मात्र भारतीय गोलंदाज आणि फलंदाज चमकले. यासह भारतीय संघाने हे आव्हान सहजरित्या पार केलं. पुढील सामन्यात भारतीय संघाचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. दरम्यान भारतीय संघासाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण कसं असेल? जाणून घ्या.

भारतीय संघाचे सुपर ८ फेरीतील पुढील सामने बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या दोन्ही संघांविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. भारत आणि बागंलादेश हे दोन्ही संघ १३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत.

IND vs BAN,Super 8: बांगलादेशला हरवूनही सेमीफायनलचं तिकीट मिळणं कठीण! टीम इंडियासाठी असं असेल समीकरण
IND vs BAN, Pitch Report: टॉस ठरणार बॉस! बांगलादेशला हरवण्यासाठी टीम इंडियाने आधी काय करावं?

तर बांगलादेश संघाला केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३१ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १९ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर ११ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून १ सामना हा अनिर्णित राहिला आहे.

IND vs BAN,Super 8: बांगलादेशला हरवूनही सेमीफायनलचं तिकीट मिळणं कठीण! टीम इंडियासाठी असं असेल समीकरण
IND vs BAN,Weather Prediction: IND vs BAN सामन्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आली मोठी अपडेट

बांगलादेशला पराभूत करुन मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

अफगाणिस्तानला पराभूत करुन भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. बांगलादेशला पराभूत करुन भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर याचं उत्तर आहे,नाही. बांगलादेशला पराभूत करताच भारतीय संघ ४ गुणांनी आघाडी घेईल आणि सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार असेल. मात्र सेमीफायनलचं कन्फर्म तिकीट मिळणार नाही.

ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झाला तर?

जर ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झाला, तरीदेखील भारतीय संघाला फारसा फरक पडणार नाही. असं झाल्यास भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन सहज सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो. जर तिन्ही संघांचे प्रत्येकी २-२ गुण असतील, तर नेट रनरेटच्या आधारे सेमीफायनलमध्ये जाणारे संघ ठरवले जातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com