Indian Bank Recruitment saam tv
बिझनेस

Indian Bank Recruitment : पदवी झाली अन् नोकरी शोधताय? इंडियन बँकेत निघाली १५०० जागांची मेगाभरती; कसा कराल अर्ज?

Apprentice Vacancy : इंडियन बँकेत १५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. जाणून घ्या पात्रता आणि वयाच्या अटी.

Sakshi Sunil Jadhav

बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पदवी पूर्ण झाली आहे आणि बँकिंग क्षेत्रात करिअरची सुरुवात करायची आहे? मग ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. इंडियन बँकेने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी तब्बल १५०० अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रोसेस ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता अर्ज प्रोसेस पूर्ण करायला घ्या.

कोण अर्ज करू शकतो?

तर या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असायला हवी. केंद्र सरकारकडून मान्यता असलेली समकक्ष शैक्षणिक पात्रताही ग्राह्य धरली जाणार आहे. विशेष म्हणजे, उमेदवाराने १ एप्रिल २०२२ ते १ नोव्हेंबर २०२६ या वर्षात पदवी पूर्ण केलेली असायला हवी.

वयोमर्यादा किती असणार?

इंडियन बँकेच्या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवाराचं वय २० वर्षे ते २८ वर्षे असायला हवं . म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ नोव्हेंबर १९९८ पूर्वी आणि १ नोव्हेंबर २००६ नंतर झालेला नसावा. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अर्ज करण्याआधी हे काम करा!

तुम्ही या भरतीचा अर्ज NATS 2.0 पोर्टल https://nats.education.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर करू शकता. नोंदणी पूर्ण झाल्यावर मिळणारा Enrolment ID जपून ठेवा. भविष्यात बँकेकडून होणाऱ्या पत्रव्यवहारासाठी या आयडीची आवश्यकता भासू शकते.

अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी सर्वप्रथम इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.bank.in ला भेट द्यावी. त्यानंतर Recruitment विभागातील Apprentice Recruitment लिंकवर क्लिक करून नोंदणी करा. आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करा. निर्धारित अर्ज शुल्क भरल्यावर फॉर्म सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

Bedsheet Changing Tips: सणासुदीला नवीन बेडशीट बदलताय? जाणून घ्या नवीन बेडशीट किती दिवसांनी बदलावी?

Gold Rate Today : लक्ष्मीपूजनापूर्वी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा सोन्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k,22k,24k चे ताजे दर

शेतकऱ्यांची दिवाळी गोड! आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 'फार्मर आयडी', फडणवीस सरकारकडून SOP जाहीर, कुणाला मिळणार लाभ?

Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेला भावाला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाहीये? कमी बजेटमध्ये पाहा ७ खास गिफ्ट आयडिया!

SCROLL FOR NEXT