Government Holiday : दिवाळी सणानिमित्त सरकारी सुट्टी जाहीर; कधी आणि कुठल्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

Maharashtra Government : दिवाळीनिमित्त मुंबई शहर आणि उपनगरातली राज्य सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
Government Holiday
Government Holidaysaam tv
Published On: 

Mumbai: दिवाळी सणाच्या आनंदात मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर राज्य सरकारी तसेच निमशासकीय कार्यालयांना सोमवार ९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातली अधिकृत शासन परिपत्रक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केले.

दिवाळीच्या अनुषंगाने स्थानिक सुट्टी जाहीर

दिवाळी सणाच्या निमित्ताने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी देण्याची मागणी आणि परंपरा लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी संबंधित कार्यालयांना तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

Government Holiday
DA Hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! DA थेट १८% वर; जुलैपासूनची थकबाकीही मिळणार

विशेष म्हणजे, यापूर्वी गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या सणांनिमित्त मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता दिवाळीच्या सणानिमित्त आणखी एका सुट्टीची भर पडली आहे.

Government Holiday
EPF New Rules 2026: नोकरदारांसाठी खूशखबर! पीएफच्या नियमात मोठा बदल; आता २५ हजार रुपयांपर्यंतच्या पगारावर मिळणार मोठा फायदा, वाचा सविस्तर

कोणत्या कार्यालयांना मिळणार सुट्टी?

राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार, ही सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या राज्य सरकारी तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू राहील. त्यामुळे या जिल्ह्यांमधील संबंधित कार्यालयांचे कामकाज ९ नोव्हेंबर रोजी बंद राहील.

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत परिपत्रक कुठे पाहाल?

या सुट्टीसंदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध केले आहे. संबंधित नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी सुट्टीबाबत अधिकृत परिपत्रक तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.