हवाई दलाच्या फ्लाइट लेफ्टनंटला किती पगार मिळतो? आकडा ऐकून धक्का बसेल FreePik
बिझनेस

Indian Air Force: हवाई दलाच्या फ्लाइट लेफ्टनंटला किती पगार मिळतो? आकडा ऐकून धक्का बसेल

Air Force: भारतीय हवाई दलात भर्ती व्हा आणि आकर्षक पगार मिळवा. आठव्या वेतन आयोगातील संभाव्य पगार वाढ, भत्ते आणि उत्तम करिअर संधीं या विषयी अधिक जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय हवाई दलात भर्ती होणे ही केवळ एक देश सेवाच नाही तर तरूणांच्या करिअर साठी एक उत्तम संधी देखील आहे. फ्लाइट लेफ्टनंट म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केवळ प्रसिद्धीच मिळत नाही तर त्यांना आकर्षक Salary ही मिळते, आणि विविध भत्त्यांचा लाभही घेता येतो. आता आठव्या वेतन आयोगांतर्गत पगार वाढ होऊ शकतो. त्यामुळे हे करिअर खूपच फायदेशीर ठरू शकते.

हवाई दलात सहभागी झाल्यावर, शिक्षण घेत असतानाच चांगला पगार दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसह इतर सुविधांचा लाभ देखील मिळतो. तुम्ही जर देश सेवा करू ईच्छिता आणि तुम्ही स्थिर सन्मानजनक करिअर शोधत असाल, तर भारतीय हवाई दल ही तुमच्यासाठी एक संधी असू शकते.

फ्लाइट लेफ्टनंटचा पगार किती असतो?

फ्लाइट लेफ्टनंटला सध्यस्थितीत ६१,३०० ते १,२०,९०० रुपयांपर्यंत पगार मिळतो. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत या पगारात सुमारे २०-३०% वाढ होऊ शकते. याचा अर्थ असा की भविष्यात फ्लाइट लेफ्टनंटचा पगार आणखी वाढू शकतो.

प्रशिक्षण कालावधीत पगार किती असतो?

प्रशिक्षण घेत असताना, अधिकारी पदाच्या भरतीवर दर महिन्याला ५६,१०० रुपये पगार दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, फ्लाइंग ऑफिसर म्हणून कमिशन मिळाल्यावर, पगार ५६,१०० ते १,७७,५०० रुपयांपर्यंत असतो.

कोणते विशेष भत्ते मिळतात?

हवई दलात अनेक प्रकारचे भत्ते आहेत, उदा: वाहतूक भत्ता, घरभाडे भत्ता, मुलांचे शिक्षण भत्ता, उड्डाण भत्ता, सियाचीन भत्ता, पर्वतीय क्षेत्र भत्ता, तांत्रिक भत्ता, क्षेत्र भत्ता, विशेष दल भत्ता.

लष्करी सेवेचा पगार काय आहे?

फ्लाइंग ऑफिसर ते एअर कमोडोर रँकपर्यंत जे अधिकर असतात त्यांना प्रत्येक महिन्याला १५,५०० रूपये लष्करी सेवा वेतन दिले जाते.

देशाची सेवा करण्याची संधी

तुम्हाला जर देशाची सेवा करण्याची खरच आवड असेल तर भारतीय हवाई दल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. भारतीय हवाई दल, नौदल किंवा सैन्य दलात सामील होऊन तुम्ही तुमच्या देशाचे संरक्षण करण्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकता.

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती होणार?

आठव्या वेतन आयोगात फ्लाइट लेफ्टनंटच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पगार ६१,३०० ते १,२०,९०० रुपयांच्या दरम्यान आहे, ज्यामध्ये २०-३०% वाढ झाल्यास अंदाजे पगार खालीलप्रमाणे असू शकतो:

२०% पगारवाढ झाल्यास:

  • किमान पगार: ६१,३०० रुपयांवरून ७३,५६० रुपये

  • कमाल पगार: १,२०,९०० रुपयांवरून १,४५,०८० रुपये

३०% पगारवाढ झाल्यास:

  • किमान पगार: ६१,३०० रुपयांवरून ७९,६९० रुपये

  • कमाल पगार: १,२०,९०० रुपयांवरून १,५७,१७० रुपये

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT