Indian Air Force Plane: भारतीय हवाई दलाचे विमान राजस्थानमध्ये कोसळले; जळून कोळसा झाला, स्फोटाच्या आवाजानं परिसर हादरला!

Indian Air Force Plane Crashed: भारतीय हवाई दलाचे विमान राजस्थानमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे.
Indian Air Force Plane Crashed
Indian Air Force Plane CrashedGoogle

राजस्थानमधील (Rajasthan) जैसलमेर जिल्ह्यातील एका गावात गुरुवारी सकाळी (25 एप्रिल) भारतीय हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना घडली (Indian Air Force Plane Crashed) आहे. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनासह हवाई दलाचे अधिकारी जिल्हा मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या ढानी जजिया गावात पोहोचले होते.

सध्या अग्निशमन दलाच्या पथकाने विमान कोसळल्यामुळे लागलेली आग आटोक्यात (Plane Crashed) आणली आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भारतीय हवाई दलाचे (IAF) UAV विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. विमान नियमितपणे उड्डाण करत (UAV Plane) होते. जैसलमेरच्या पिठाळा भागात हा अपघात झाला आहे.

हे विमान (Indian Air Force) सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते, असं सांगितलं जात आहे. पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितलं की, ते हेरगिरी करणारं विमान असू शकते. विमान क्रॅश झाल्यानंतर त्यात मोठी आग लागली होती. त्यामुळे ते जळून राख झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता.

Indian Air Force Plane Crashed
Helicopter Crash Video : आकाशात लष्कराच्या २ हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक; भीषण अपघातात १० लोकांचा मृत्यू, Video

हवाई सेवेच्या या विमानात पायलट नसतात. ते रिमोट कंट्रोलने चालवले (Plane Crashed In Rajasthan) जाते. या विमानाचा वापर सीमा भागातील हेरगिरीच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. जैसलमेरच्या पिठाळा गावाजवळ (Pithala Area) हे विमान मोठा स्फोट होऊन खाली कोसळले.

स्फोटाचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक विमान अपघातस्थळी पोहोचले आहेत. विमान अपघातानंतर कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. अपघाताचे कारण शोधण्यासाठी न्यायालयीन चौकशी स्थापन करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती जनसत्ताच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

Indian Air Force Plane Crashed
Tejas Fighter Plane: देशाच्या नव्या फायटर जेट तेजसं Mk1A चं यशस्वी उड्डाण; जाणून घ्या किती घातक आहे फायटर जेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com