Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Income Tax Refund: ITR फाइल करुनही रिफंड अकाउंटमध्ये जमा झाला नाही? असू शकतात ही ५ कारणे

Income Tax Refund : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केल्यानंतर काही दिवसांतच करदात्यांच्या अकाउंटला रिफंड जमा होतो. परंतु तुमच्या अकाउंटला रिफंड जमा झाला नाही किंवा रिफंड जमा व्हायला उशीर होत असेल तर त्यामागे ही कारणे असू शकतात.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीक उलटून गेली आहे. आयटीआर फाइल केल्यानंतर आता करदाते रिफंडची वाट पाहत आहे. रिफंडची प्रक्रिया ही तुमचे कागदपत्रे ई- वेरिफाय झाल्यानंतरच सुरु होणार आहे. सामान्यत आयटीआर फाइल केल्यानंतर ४-५ आठवजड्यांमध्ये परतावा तुमच्या अकाउंटला जमा होतो.

ज्या व्यक्तींचा निर्धारित टॅक्स कापला गेला आहे. त्याच करदात्यांना रिफंड मिळतो. यामध्ये TDS,TCS यांचाही समावेश असतो. परंतु अनेकदा रिफंड जमा व्हायला उशीर होतो किंवा अनेकदा होतच नाही. तुमच्या खात्यात रिफंड जमा न होण्याची कारणे जाणून घेऊयात.

आयटीआर फाइल केल्यानंतरही रिफंड जमा न होण्याची अनेक कारणे आहेत. या कारणांमुळे तुमचा रिफंड जमा होण्यास उशीर होऊ शकतो.

1. बँक अकाउंटची चुकीची माहिती

2. बँक खाते वेरिफाय केलेले नसणे

3. आयटीआर भरताना चुकीची माहिती देणे

4.मागील वर्षी करदात्यांनी टॅक्स भरला नाही

5. जेव्हा बँक खाते आणि पॅन कार्डवरील नाव सारखे नसते.

या कारणांमुळे करदात्याचा रिफंड जमा होण्यात उशीर होतो किंवा रिफंड जमा होत नाही. रिफंड जमा न झाल्यास तुम्ही रिफंड रि इश्यू करु शकतात.

जर तुमच्या पॅन कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव हे जुळत नसेल तर तुम्हाला रिफंड येण्यास अनेक अडचणी येऊ शकतात. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पॅन कार्ड अपडेट करावे लागेल. त्यानंतर तुमच्या बँकेत जाऊन माहिती बदलावी लागेल.

तुमचा आयटीआर रिफंड मिळण्यास उशीर झाल्यास काय करावे

आयकर विभागाने जर तुमचा आयटीआर नाकारला असेल तर तर करदात्यांनी पुन्हा एकदा रिफंडसाठी अप्लाय करावे. त्याचसोबत तुम्ही आयकर हेल्पलाइन नंबर 1800-130-4455 या नंबरवर संपर्क साधू शकतात. तसेच ask@incometax.gov.in या ई-मेलवर संपर्क करु शकतात. याचसोबत तुम्ही तुमची समस्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाऊन सांगू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank News : सांगली जिल्हा बँकेचं तब्बल ५१ कोटींचं नुकसान, आजी-माजी संचालकांना नोटीस, नेमकं प्रकरण काय ?

Maharashtra Live News Update: - राज्याच्या गृहविभागाकडून १५ हजार ६३१ पोलिस शिपायांच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू

Vote Chori: व्होट चोरीसाठी झिरो नंबरचा खेळ? हाऊस नंबर झिरो, मग घरात राहतं कोण? राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच, १० तोळे सोनं ४३०० रुपयांनी महागलं; २४ -२२ कॅरेटचे आजचे भाव किती?

IND vs AUS : हेड आज संघाबाहेर, भारताच्या संघात बदल होणार? पाहा प्लेईंग ११ मध्ये कुणाला संधी

SCROLL FOR NEXT