Income Tax Canva
बिझनेस

Income Tax: इन्कम टॅक्सबाबत ही १० कामे आजच करा; अन्यथा भरावा लागेल अतिरिक्त कर

Do These Income Tax Related Work Before 31st March: आज तुम्हाला पैशांसंबंधित काही कामे करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये अपडेटेड आयटीआर भरण्यापासून अनेक गोष्टी आहेत.

Siddhi Hande

उद्यापासून नवीन २०२५-२६ हे आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. नवीन आर्थिक वर्षात नवीन कर प्रणालीदेखील लागू होणार आहे. त्यामुळे करदात्यांच्या आणि गुंतवणूकदारांच्या खिशावर चांगलाच परिणाम होणार आहे. यामुळे काही कामे ही तुम्हाला आजच पूर्ण करायची आहेत. या वर्षात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला पुढच्या वर्षी टॅक्समधून सवलत मिळणार आहे.तुम्हाला टॅक्ससंबंधित ही कामे आजच पूर्ण करायची आहेत.

ही कामे ३१ मार्चपूर्वी करा पूर्ण

टॅक्स डिडक्शनचे फायदे (कलम 80C )

तुम्ही कलम 80C अंतर्गत टॅक्समधून सवलत मिळवू शकतात. तुम्ही पीपीएफ, ईएलएसएस, एफडीमध्ये गुंतवणूक करुन १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर टॅक्सपासून सूट मिळवू शकतात.

एनपीएसमध्ये गुंतवणूक

तुम्ही नॅशनल पेन्शन योजनेत ५०,००० रुपयांच्या गुंतवणूकवर कलम 80CCD (1B)अंतर्गत सूट मिळते. याचसोबत कलम 80C अंतर्गत १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर सूट मिळते.

आरोग्य विमा

जर तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स खरेदी केला असेल तर ७५००० रुपयांच्या प्रिमियमवर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. तर ज्येष्ठ नागरिकांना ५०,००० रुपयांच्या गुंतवणूकीवर सूट मिळणार आहे.

अपडेटेड आयटीआर

तुम्ही २०२३-२४ चे अपडेटेड आयटीआर आजपर्यंत दाखल करु शकतात. तुमचे मागच्या आयटीआरमध्ये काही चुका झाल्या असतील किंवा तुम्ही आयटीआर भरला नसेल तर तुम्ही तो भरु शकतात.

टॅक्स भरण्याची शेवटची तारखी

२०२३-२४ या वर्षात टीडीएस भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. जर तुमचा टीडीएस १०,००० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही तो आजपर्यंत भरा अन्यथा तुम्हाला भरावा लागेल.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लवकरात लवकर लिंक करा. अनेक कामांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे.

चलन कम सर्टिफिकेट

तुमच्या टॅक्स डिडक्शनसाठी चलन कम सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे.

फॉरेन इन्कम क्लेम

तुम्हाला तुमच्या फॉरेन इन्कमच्या क्लेमचे स्टेटमेंट अपलोड करावे लागणार आहे. याचसोबत तुमचा टॅक्स भरायचा आणि डिडक्शन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

TDS ची माहिती

तुम्हाला टीडीएस डिडक्शनसाठी व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. यासाठी 26AS and AIS फॉर्म चेक करावा लागेल.

HRA आणि LTA क्लेम

तुम्ही घराचे भाडे (HRA) ची रिसिप्ट सबमिट करावी लागणार आहे. तुम्ही ३१ मार्चपूर्वी HRA आणि LTA क्लेमसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT