Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Income Tax Refund: आयटीआर फाइल केलाय, पण अजूनही रिफंड आला नाही? ही कारणे असू शकतात कारणीभूत

Income Tax Refund Delay Reasons: करदात्यांनी आयटीआर फाइल केला आहे. दरम्यान, आयटीआर फाइल करुनही तुम्हाला अजून रिफंड मिळाला नसेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Siddhi Hande

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी

आयटीआर फाइल केला अन् अजूनही रिफंड आला नाही

रिफंड न येण्याची कारणे

करदात्यांना आयटीआर फाइल करावा लागतो. आयटीआर फाइल केल्यानंतर ३-४ आठवड्यात रिफंडचे पैसे दिले जातात. बँक अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातात. दरम्यान, जर कमी रक्कमेचा रिफंड असेल तर त्याचं प्रोसेसिंग लगेच होते. जर अमाउंट जास्त मोठी असेल तर रिफंड येण्यास उशिर होते. दरम्यान, तुम्हाला जर रिफंड उशिराने मिळाला असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

रिफंड उशिरा येण्याची कारणे

१. चुकीचे बँक अकाउंट

आयकर रिफंड येण्यासाठी बँक अकाउंट प्री वॅलिडेट असणे गरजेचे आहे. तुम्ही आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन अकाउंट प्री वॅलिडेट आहे की नाही हे चेक करु शकतात. अकाउंट प्री वॅलिडेटेड असेल तर लगेच अकाउंटमध्ये रिफंड जमा होतो.

२. आयटीआर वेरिफाय न करणे

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी वेरिफाय असणे गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आयटीआर वेरिफाय करणे गरजेचे आहे. तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील वेरिफाय करु शकतात.आयटीआर फाइल केल्यानंतर ३० दिवसात वेरिफाय करणे गरजेचे आहे.

३. डिफेक्टिव्ह रिटर्नच्या नोटिसला उत्तर देण्यास उशिर

आयकर विभाग जर रिटर्नमध्ये काही चुका आढळल्या तर डिफेक्टिव्ह नोटीस जारी करतात. जर तुम्ही या नोटीसला १५ दिवसांच्या आत उत्तर दिले नाही तर पुढे प्रोसेसिंग होत नाही. त्यामुळे रिफंडचे पैसे लवकर मिळत नाही.

४. डिडक्शनसाठी चुकीचा क्लेम

आयकर विभाग डिडक्शन आणि एग्जेम्पशन क्लेमची छाननी करतात. जर आयकर विभागाला यामध्ये काही चुका आढळल्या तर प्रोसेसिंग करता येत नाही. त्यामुळे रिफंड मिळत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत जाताना रस्ता अडवायचा, इन्स्टावर मेसेज अन्...; सिनियरच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

Kothimbir Dishes : कोथिंबीरपासून तयार होणाऱ्या ५ अप्रतिम आणि झटपट बनणाऱ्या डिशेस

Suraj Chavan: सूरज चव्हाणने बंगला बांधलाय ते ठिकाण कुठे आहे?

Gold Price: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १० तोळा सोनं ५४०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: तपोवनातील साधुग्राम परिसरातील साफ सफाईला सुरुवात

SCROLL FOR NEXT