Pension: ३० नोव्हेंबरआधी ही ३ कामे कराच, अन्यथा मिळणार नाही पेन्शन; थेट नोटीस येणार

Do These Work Before 30 November: तुम्हाला ३० नोव्हेंबरपूर्वी पेन्शन, टॅक्ससंदर्भात काही कामे करायची आहे. जर तुम्ही लाइफ सर्टिफिकेट अपलोड केले नाही तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाहीये.
Pension
PensionSaam Tv
Published On
Summary

३० नोव्हेंबरपूर्वी पेन्शनधारकांनी हे काम करा

अन्यथा मिळणार नाही पेन्शन

टॅक्ससंबंधित ही कामे ३० नोव्हेंबरपूर्वी करणे गरजेचे

नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नोव्हेंबर महिन्यात पैशांसंबंधित काही महत्त्वाचे बदल झाले होते. दरम्यान, यामध्ये पेन्शनधारकांना त्यांचे लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागणार आहे. ३० नोव्हेंबरपूर्वी तुम्हाला हे काम करावे लागणार आहे. अन्यथा तुमची पेन्शन बंद केली जाईल.

पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला लाइफ सर्टिफिटकेट, टॅक्ससंबंधिच फॉर्म, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस यासंबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. याचसोबत तुम्हाला दंडदेखील भरावा लागू शकतो.

Pension
8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; सर्वात मोठा फायदा रद्द होण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांना यूनिफाइड पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची डेडलाइन आहे. याआधी ही मुदत ३० सप्टेंबर होती. ही मुदत आता वाढवून ३० नोव्हेंबर केली आहे. त्यामुळे तुम्हाला जर यूपीएस योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

१. UPS मध्ये सहभागी होण्याची शेवटची तारीख

UPS आणि NPS या दोन वेगवेगळ्या योजना आहे. यूपीएसअंतर्गत कर्मचारी आपल्या बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्यातील १० टक्के योगदान जमा केले जाते. आता कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा यूपीएससचा लाभ मिळणार आहे. जर कर्मचाऱ्यांना यूपीएस योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ३० नोव्हेंबरआधी अर्ज करावा लागेल.

२. लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख

पेन्शनधारकांना ३० नोव्हेंबरपूर्वी जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. लाइफ सर्टिफिकेट तुम्ही बँक, सीएससी सेंटर, सरकारी ऑफिस किंवा ऑनलाइन पद्धतीने जमा करु शकतात. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने आता ही प्रोसेस आणखी सोपी केली आहे. आता पेन्शनधारकांच्या घरी जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट बनवले जाईल.

Pension
8th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाची बातमी! बेसिक सॅलरी ₹१८००० वरुन ४४,२८० होण्याची शक्यता

३. टॅक्ससंबंधित फॉर्म

टॅक्ससंबंधित अनेक फॉर्म आणि स्टेटमेंट जमा करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. ऑक्टोबर २०२५ साठीचे Sections 194-IA, 194-IB, 194M आणि 194S अंतर्गत चलान कम स्टेटमेंट जमा करणे गरजेचे आहे. तसेच Section 92E अंतर्गत आंतरराष्ट्रीय आणि घरगुती ट्रान्झॅक्शन करणाऱ्या करदात्यांना ३० नोव्हेंबरपूर्वी आयटीआर फाइल करायचा आहे.

Pension
ITR Filling: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! अजूनही फाइल करता येणार आयटीआर; स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com