Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Income Tax Refund: आयटीआर फाइल करुन दोन महिने उलटले, अजून रिफंड आला नाही? ही असू शकतात कारणे

Income Tax Refund News: करदात्यांनी आयटीआर फाइल केले आहेत. मात्र, अजूनही अनेक करदात्यांना रिफंडचे पैसे मिळाले नाहीत. रिफंडचे पैसे न मिळण्यामागची कारणे जाणून घ्या.

Siddhi Hande

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी

आयटीआर फाइल केला अजूनही रिफंड आला नाही

रिफंड न येण्यामागची कारणे काय?

दरवर्षी लाखो करदाते हे आयटीआर फाइल करतात. आयटीआर फाइल केल्यानंतर त्यांना रिफंड मिळतो. दरम्यान, अनेकांना रिफंड मिळाला आहे. अजूनही काही जणांच्या खात्यात रिफंडचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे करदात्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करदात्यांना रिफंड कधी मिळणार असा प्रश्न विचारत आहेत.

काही करदात्यांना आयटीआर रिटर्न Under Processing दाखवत आहे. तर काहींना Defective Return असं दिसतंय. दरम्यान, अनेक करदात्यांना रिफंड न येण्यामागचे कारण समजले नाही. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारले आहेत. याचसोत आता काय करावे, असा प्रश्न करदात्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर वाढतायत तक्रारी

मागील काही दिवसांपासून टॅक्स रिफंड उशिरा येण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे अनेक जणांनी रिवाइज्ड रिटर्नदेखील फाइल केले आहेत. यानंतर अनेकांना रिटर्न मिळाले आहेत परंतु काहींना अजूही वाट पाहावी लागतेय.

रिफंड न येण्यामागची कारणे (ITR Refund Delay Reasons)

१ लाखपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांसाठी विभाग अतिरिक्त चौकशी करते. यामुळे प्रोसेसिंगमध्ये उशिर होतो.

ज्या आयटीआरमध्य फॉरेन इन्कम, कॅपिटल गेन किंवा इतर इन्कम सोर्स असेल तर त्याला मॅन्युअल व्हेरिफिकेशनमधून जावे लागते.

कलम १५४ अंतर्गत Defective Return ची नोटीस मिळाल्यानंतर तुम्हाला नवीन आयटीआर फाइल करेपर्यंत रिफंड मिळणार नाही.

जर तुम्ही रिवाइज्ड आयटीआर फाइल केला असेल तर नवीन सिस्टीममध्ये डेटा प्रोसेस होण्यासाठी वेळ लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satbara: मोठा निर्णय! आता १०० वर्षांपूर्वीचाही सातबारा काढता येणार; एका क्लिकवर होणार सर्व कामं

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' ची चमकदार ट्रॉफी पाहिली का? PHOTO होतोय व्हायरल

पोलिसांचा बारवर छापा; महिला अन् पुरूष सोफ्यावर बसून करत होते भयंकर कृत्य, २५ जण ताब्यात

Maharashtra Live News Update: शरद पवार घेणार बाबा आढाव यांची भेट

Dr Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिवस का म्हणतात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT