Income Tax Saam tv
बिझनेस

Income Tax Filing: ITR मधील छोट्या चुका पडतील महागात; होईल 200% दंड, अन् 7 वर्षाची कैद

ITR Filing 2025 Mistakes Penalty : नोकरदारांना सध्या आयटीआर दाखल करण्याची चिंता लागलीय. काही लोकांनी 31 जुलै आधी आयटीआर फाईल करायचा तर काहींना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. पण काहीजण आयटीआर दाखल करताना काही खोटे दावे करतात, ज्याची त्यांना नंतर मोठी किंमत मोजावी लागते.

Bharat Jadhav

तुम्ही आयटीआर रिटर्नचा अर्ज भरत आहात का तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आयकर रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. तसेच रिटर्न भरताना सामान्य चुका टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयकर विभागाने आता करदात्यांवर पाळत वाढवलीय.

पगारदारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वजण इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करायची घाई करत आहेत. पण तुम्ही जास्तीत जास्त परताव्याच्या आमिषाने खोटे कर कपातीचे दावे करत असाल तर तुम्हाला ते महागात पडणार आहे.

आयकर विभागाकडे कर कपातीचे खोटे दावे केले तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. प्रत्यक्षात आयकर विभाग कर कपातीच्या खोट्या दाव्यांची चौकशी केलं जाणार आहे. ही चौकशी एआय आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर करत आहे. प्राप्तिकर विभागाचा हा बदल फसव्या पद्धतींना विशेषतः ‘गॅरंटीड रिफंड’चा दावा करणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न आहे.

इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी कलम 10(13A) अंतर्गत घरभाडे भत्ता (एचआरए), कलम 80G अंतर्गत देणग्या आणि कलम 80 च्या विविध कलमांखाली कर्ज व्याज यासारख्या वजावटीच्या कलमांचा व्यापक गैरवापर उघडकीस आणलाय. जर तुम्ही कर कपातीचा खोटा दावा केला असेल. तर आयकर विभागाचे एआय सिस्टीम तुमचा दावा पकडेल. खोट्या दाव्यामुळे आयकर कायद्यात कपातीबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल कठोर दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे कर दायित्वाच्या 200% पर्यंत दंड आणि वार्षिक 24% पर्यंत व्याज आकारले जाईल.

आयटीआर फाइल करण्यापूर्वी Form 16,AIS,26AS डेटा मॅच करणे गरजेचे आहे. हे फॉर्म तुम्ही वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करु शकतात. यामध्ये टीडीएस, टीसीएसची माहिती दिलेली असते. आयटीआर फॉर्म हा प्रत्येक उत्पन्न गटासाठी वेगवेगळा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार वेगवेगळे फॉर्म भरा. आयटीआर फाइल करताना फॉर्म १६ असणे अनिवार्य आहे. तुम्हाला तुमच्या सर्व संपत्तीची माहिती द्यावी. परदेशात जर तुम्ही काही प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर त्याचीही माहिती द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कुठलीही बॅग, पिशवी, बाटली नेण्यास बंदी

FASTag KYC: तर तुमचं FASTag होणार कायमचे बंद; कारण काय? वाचा सविस्तर

Mumbai : ऑटोमध्ये पिटबुलने मुलाच्या मानेचे लचके तोडले, वाचवण्याऐवजी मालक खिदळत राहिला

Latur Band : छावाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याची बेदम मारहाण, राज्यात पडसाद, आज लातूर बंद

Horoscope Monday Update: कामिका एकादशीचे व्रत फलदायी ठरेल, प्रगतीची आस राहील; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT